भारतीय वंशाच्या मेघा राजगोपाल यांना ‘पुलित्झर’
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 05:45 AM2021-06-14T05:45:12+5:302021-06-14T05:45:38+5:30
आंतरराष्ट्रीय रिपोर्टिंगमध्ये शिजियांग प्रांताच्या या वृत्त मालिकेसाठी राजगोपाल यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
न्यूयॉर्क : भारतीय वंशाच्या पत्रकार मेघा राजगोपाल यांना पुलित्झर पुरस्कार देण्यात आला आहे. अशांत शिंजियांग प्रांतात लाखो मुस्लिम लोकांना नजरकैदेत ठेवण्यासाठी चीनकडून बनविण्यात आलेले तुरुंग आणि अन्य ठिकाणांची माहिती त्यांनी सार्वजनिक केली होती.
आंतरराष्ट्रीय रिपोर्टिंगमध्ये शिजियांग प्रांताच्या या वृत्त मालिकेसाठी राजगोपाल यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. बजफीड न्यूजच्या राजगोपाल यांच्यासह दोन अन्य पत्रकारांना नावीन्यपूर्ण शोध पत्रकारितेसाठी पुलित्झर पुरस्कार देण्यात आला आहे. पत्रकारिता क्षेत्रात दिला जाणारा अमेरिकेतील हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार आहे.
तंपा बे टाइम्सच्या नील बेदी यांना लोकल रिपोर्टिंगसाठी पुलित्झर पुरस्कार देण्यात आला आहे. याशिवाय कैथलीन मॅकग्रॉरी यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
काय आहे वृत्त...
n २०१७ मध्ये चीनने शिंजियांग प्रांतात लाखो मुस्लिम लोकांना नजरकैदत ठेवले होते. तेव्हा राजगोपाल या पहिल्या अशा पत्रकार होत्या ज्यांनी या भागाचा दौरा केला.
n त्यावेळी चीनने अशी कोणतीही जागा असल्याचा दावा फेटाळला होता. बजफीड न्यूजने पुलित्झर पुरस्कारासाठीच्या नोंदीत म्हटले होते की, या वृत्ताच्या प्रत्युत्तरात चीनच्या सरकारने पत्रकाराला गप्प करण्याचा प्रयत्न केला.