सेक्स वर्कर म्हणणा-या वेबसाईटवर मेलेनिया ट्रम्पनी भरला खटला
By admin | Published: September 2, 2016 01:20 PM2016-09-02T13:20:17+5:302016-09-02T13:35:16+5:30
रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प यांनी डेली मेल वेबसाईटवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. २ - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प यांनी डेली मेल वेबसाईट आणि अमेरिकन लेखक वेबस्टर तारप्ली विरोधात १५० मिलियन डॉलरच्या अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. अमेरिकन लेखक वेबस्टर तारप्लीने मेलेनियाला आपला भूतकाळ सार्वजनिक होण्याची भिती वाटते असे लिहीले होते.
डेली मेलने आपल्या भूतकाळाविषयी चुकीची माहिती छापून बदनामी चालवल्याने आपल्याला अब्रुनुकसानीचा खटला दाखल करावा लागला असे मेलेनिया ट्रम्प यांनी सांगितले.
आपण कॉल गर्ल, सेक्स व्यवसायाशी संबंधित असल्याचा सुचवण्याचा डेली मेलने प्रयत्न केला असा आरोप मेलेनिया ट्रम्प यांनी केला आहे. मेलेनिया ट्रम्प यांनी १९९० च्या दशकात ज्या मॉडलिंग एजन्सीसाठी काम केले ती एजन्सी कॉल गर्ल व्यवसायाशी संबंधित असल्याचे वृत्त डेली मेल मध्ये प्रसिद्ध झाले होते. नंतर डेली मेलने हे वृत्त मागे घेतले होते.
मेलेनिया ट्रम्प ४६ वर्षांच्या आहेत. स्लोवेनियामध्ये जन्मलेल्या मेलेनिया १९९० च्या दशकात काम करण्यासाठी म्हणून अमेरिकेला गेल्या. २००५ मध्ये त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर लग्न केले.