एक खरबूज...पण किंमत तब्बल 8 लाख, कारण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2017 09:43 PM2017-03-30T21:43:33+5:302017-03-30T21:43:33+5:30
उन्हाळा सुरू झाला की बाजारपेठांमध्ये खरबूज सरास पाहायला मिळतात. सामान्यतः 30 ते 40 रूपयांमध्ये मिळणा-या खरबुजाची किंमत जर कोणी तुम्हाला 8 लाख सांगितली तर...
Next
>ऑनलाइन लोकमत
टोकियो, दि. 30 - उन्हाळा सुरू झाला की बाजारपेठांमध्ये खरबूज सरास पाहायला मिळतात. सामान्यतः 30 ते 40 रूपयांमध्ये मिळणा-या खरबुजाची किंमत जर कोणी तुम्हाला 8 लाख सांगितली तर...विश्वास बसत नसला तरी हे खरं आहे. एका खरबुजाची तब्बल 8 लाख रूपयांना विक्री झाली आहे.
जपानमध्ये दोन खरबुजांची किंमत तब्बल 17 लाख 41 हजार रुपये इतकी विक्री झालीये. म्हणजे एक खरबूज जवळपास साडे आठ लाख रूपयांना विकला गेलाय. खरबुजच्या या खास जातीला यूबारी किंग नावाने ओळखलं जातं. जपानच्या यूबारी क्षेत्रात या जातीच्या खरबुजाचं उत्पादन घेतलं जातं.
जपानच्या ह्योगो प्रांतात एक सुपर मार्केट आहे, तेथे या खास खरबुजाची खरेदी- विक्री होते. इतकी प्रचंड किंमत असण्याचं कारण म्हणजे या खरबुजाची चव. सामान्य खरबुजापेक्षा हे खरबूज खूप जास्त गोड आहे आणि चवीला अत्यंत स्वादिष्ट आहे.