चिनी कंडोमची कीर्ती महान, पण झिम्बाब्वेत पडतोय आकार लहान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2018 02:03 PM2018-03-05T14:03:03+5:302018-03-05T14:53:19+5:30

चिनी कंडोमचा आकार लहान असल्याची तक्रार झिम्बाब्वेमधील पुरुषांनी केली आहे. हे प्रकरण इतकं गंभीर झालं आहे की, झिम्बाब्वेमधील आरोग्य मंत्र्यांनाही याची दखल घ्यावी लागली आहे.

Men in Zimbabwe complaint Chinese condoms are too small | चिनी कंडोमची कीर्ती महान, पण झिम्बाब्वेत पडतोय आकार लहान

चिनी कंडोमची कीर्ती महान, पण झिम्बाब्वेत पडतोय आकार लहान

googlenewsNext

हरारे - चिनी वस्तूंनी जगभरात आपलं मार्केट तयार केलं आहे. मात्र चिनी वस्तू जितक्या वस्तूने मार्केटवर कब्जा करत आहेत, तितक्याच वेगाने त्यांच्या वस्तूंच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सध्या झिम्बाब्वेत चिनी कंडोममुळे एक वेगळाच वाद निर्माण झाला आहे. चिनी कंडोमचा आकार लहान असल्याची तक्रार झिम्बाब्वेमधील पुरुषांनी केली आहे. हे प्रकरण इतकं गंभीर झालं आहे की, झिम्बाब्वेमधील आरोग्य मंत्र्यांनाही याची दखल घ्यावी लागली आहे. चिनी कंडोमचा आकार छोटा पडत असल्या कारणाने पुरुषांना एड्सची लागण होण्याची भीती आहे. 

आज संपुर्ण जगभरात एड्ससारख्या गंभीर आजाराशी लढण्यासाठी तसंच लोकसंख्या नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीने कंडोमचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. या देशांपैकी एक झिम्बाब्वे आहे, जिथे एड्सची लागण होऊ नये यासाठी कंडोमचा वापर केला जात आहे. झिम्बाब्वेत चिनी कंडोम अत्यंत लोकप्रिय आहेत. मात्र येथील आरोग्य मंत्री डेव्हिड परीरनेयातवा सध्या चिनी कंडोममुळे मिळणा-या तक्रारींमुळे हैराण आहेत. त्यांनी चिनी कंपन्यांकडे तक्रार केली असून, झिम्बाब्वेमधील पुरुषांना कंडोम लहान पडत असल्याचं म्हटंल आहे. 

नुकतंच राजधानी हरारेमध्ये एड्सला रोखण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना डेव्हिड परीरनेयातवा यांनी म्हटलं की, 'देशातील तरुण चिनी कंडोमसंबंधी तक्रार करत असून, आकार छोटा पडत असल्याचं म्हणत आहेत'. आरोग्य मंत्र्यांनी यावेळी स्थानिक कंपन्यांना चिनी कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी देशातच कंडोमची निर्मिती करण्याचं आवाहन केलं आहे. देशातील एड्सचा मुद्दा उपस्थित करताना त्यांनी सांगितलं की, 'तुम्हा सर्वांना माहित आहे की, झिम्बाब्वेत एचआयव्ही पीडितांची संख्या किती जास्त आहे आणि यामध्ये महिला, पुरुष दोघेही सामील आहेत'.

झिम्बाब्वेत एचआयव्ही पीडितांची संख्या जास्त आहे. एड्सच्या आकडेवारीबद्दल बोलायचं गेल्या, आफ्रिकी खंडात झिम्बाब्वे सहाव्या क्रमांकावर आहे. 

मिळालेल्या तक्रारीनंतर चीनने समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. सध्या चिनी कंपन्या सर्व्हे करत असून, यानंतर लोकांच्या मागणीप्रमाणे कंडोमची निर्मिती केली जाणार आहे. चिनी कंडोमसंबंधी तक्रार करणार झिम्बाब्वे पहिलाच देश नसून याआधी आफ्रिकी देश घानानेही ही तक्रार केली होती. चीनने घानाला निर्यात केलेले 10 लाख कंडोम खराब निघाले होते. 

Web Title: Men in Zimbabwe complaint Chinese condoms are too small

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.