मोदींना प्रश्न विचारणाऱ्या महिला पत्रकाराचा मानसिक छळ, अमेरिकेने केला तीव्र निषेध...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 06:33 AM2023-06-28T06:33:37+5:302023-06-28T06:34:06+5:30

journalist: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतातील अल्पसंख्याकांच्या हक्कांविषयी प्रश्न विचारणाऱ्या वॉल स्ट्रीट जर्नलच्या पत्रकार सबरिना सिद्दीकी यांचा अनेक जणांनी ऑनलाइनच्या माध्यमातून मानसिक छळ केला.

Mental torture of a female journalist asking questions, America strongly protested... | मोदींना प्रश्न विचारणाऱ्या महिला पत्रकाराचा मानसिक छळ, अमेरिकेने केला तीव्र निषेध...

मोदींना प्रश्न विचारणाऱ्या महिला पत्रकाराचा मानसिक छळ, अमेरिकेने केला तीव्र निषेध...

googlenewsNext

वॉशिंग्टन : अमेरिका दौऱ्यात राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या समवेतच्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतातील अल्पसंख्याकांच्या हक्कांविषयी प्रश्न विचारणाऱ्या वॉल स्ट्रीट जर्नलच्या पत्रकार सबरिना सिद्दीकी यांचा अनेक जणांनी ऑनलाइनच्या माध्यमातून मानसिक छळ केला. त्याचा अमेरिकेने तीव्र निषेध केला. 
अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी म्हटले की, मोदी यांना प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराचा ऑनलाइनच्या माध्यमातून मानसिक छळ करणे ही अतिशय चुकीची व लोकशाहीला काळिमा फासणारी गोष्ट आहे. अल्पसंख्याकांच्या हक्कांवर तुमच्या सरकारने गदा आणली आहे, टीकाकारांना गप्प बसविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा काही मानवी हक्क संघटनांचा आक्षेप आहे. अल्पसंख्याकांच्या हक्कांची  जपणूक होण्यासाठी काय पावले उचलली आहेत, असा प्रश्न सिद्दीकी यांनी विचारला होता. 

Web Title: Mental torture of a female journalist asking questions, America strongly protested...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.