मर्केल यांना पाठवली निर्वासितांची बस
By admin | Published: January 16, 2016 02:28 AM2016-01-16T02:28:01+5:302016-01-16T02:28:01+5:30
जर्मनीतील एका छोट्या शहरातील नागरिकांनी अँजेला मर्केल यांच्या कार्यालयात निर्वासित नागरिकांची एक बसच पाठवून दिली. मर्केल यांनी निर्वासितांबाबत जी भूमिका घेतलेली आहे,
बर्लिन : जर्मनीतील एका छोट्या शहरातील नागरिकांनी अँजेला मर्केल यांच्या कार्यालयात निर्वासित नागरिकांची एक बसच पाठवून दिली. मर्केल यांनी निर्वासितांबाबत जी भूमिका घेतलेली आहे, त्याला विरोध म्हणून हे अनोखे आंदोलन करण्यात आले.
गेल्या वर्षी जर्मनीने ११ लाख निर्वासितांना प्रवेश दिला आहे. निर्वासितांच्या प्रवेशाचे तीव्र पडसाद आता या देशात उमटत आहेत. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, आम्ही या निर्वासितांना मदतच करीत आहोत; पण आणखी निर्वासितांना प्रवेश देणे शक्य नाही.
पीटर ड्रिअर या नागरिकाने सांगितले की, निर्वासितांच्या येण्याचे जे प्रमाण आहे ते सध्या तरी थांबेल असे वाटत नाही; परंतु निर्वासितांमुळे येथील जनजीवनावर त्याचा प्रभाव पडला आहे.
एकूणच, अँजेला मर्केल यांच्या उदार धोरणाचा स्थानिक नागरिक विरोध करताना दिसत आहेत.
ही बस दाखल होताच पोलीस
आणि प्रसारमाध्य प्रतिनिधींनी या बसला गराडा घातला, तर
बसमधील निर्वासित चिंतेत दिसत होते. (वृत्तसंस्था)