'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी'पेक्षा मोठा उल्कापिंड पृथ्वीच्या दिशेने येतोय, नासाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 09:50 PM2021-09-02T21:50:57+5:302021-09-02T22:02:29+5:30

NASA updates: 2021 NY1 नावाचा उल्कापिंड 22 सप्टेंबरला पृथ्वीच्या कक्षेत येईल.

A meteorite larger than the Statue of Liberty is approaching Earth, NASA reports | 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी'पेक्षा मोठा उल्कापिंड पृथ्वीच्या दिशेने येतोय, नासाची माहिती

'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी'पेक्षा मोठा उल्कापिंड पृथ्वीच्या दिशेने येतोय, नासाची माहिती

Next

वॉशिंग्टन: आपल्या पृथ्वीकडे एक मोठं संकट झेपावत आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने दिलेल्या माहितीनुसार, 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी'पेक्षा तीनपट मोठ्या आकाराचा एक उल्कापिंड पृथ्वीच्या दिशेने येतोय. लवकरच हा पृथ्वीच्या कक्षेत दाखल होईल.

शास्त्रज्ञांचे 60 दिवसांपासून लक्ष

नासानं दिलेल्या माहितीनुसार, या उल्कापिंडाचे नाव 2021 NY1 असून, हा 33659 किलोमीटर प्रति तासांच्या वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे. गेल्या 60 दिवसांपासून शास्त्रज्ञ या उल्कापिंडावर लक्ष ठेवून आहेत. 2021 NY1 पृथ्वीच्या जवळ येणाऱ्या 17 Near-Earth objects पैकी एक आहे. 

पृथ्वीवर धडकण्याची शक्यता कमी
नासाने पुढे सांगितलं की, 2021 NY1 उल्कापिंडाचा व्यास 130-300 मीटर आहे. शास्त्रज्ञांना आशा आहे की, हा पृथ्वीच्या दिशेने येत असला तरी, पृथ्वीच्या कक्षेत आल्यानंतर पृथ्वीवर न आदळता, बाजूने निघून जाईल. 22 सप्टेंबरला हा उल्कापिंड पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करू शकतो.

Web Title: A meteorite larger than the Statue of Liberty is approaching Earth, NASA reports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.