#MeToo मोहिमेची वर्षपूर्ती; आरोप ५० जणांवर, पण शिक्षा एकालाच
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 02:04 PM2018-10-10T14:04:56+5:302018-10-10T14:43:44+5:30
भारतात गेल्या महिनाभरापासून मनोरंजन आणि राजकीय क्षेत्रात भूकंप आणलेल्या मीटू या मोहिमेला आज एक वर्ष पूर्ण झाले. 10 ऑक्टोबर 2017 ला #MeToo या शब्दप्रयोगाचा अर्थ लैंगिक अत्याचाराचा बळी असा असल्याचे पहिल्यांदाच समजले आणि ग्लॅमरस दुनियेमध्ये एकच वादळ निर्माण झाले.
भारतात गेल्या महिनाभरापासून मनोरंजन आणि राजकीय क्षेत्रात भूकंप आणलेल्या मीटू या मोहिमेला आज एक वर्ष पूर्ण झाले. 10 ऑक्टोबर 2017 ला #MeToo या शब्दप्रयोगाचा अर्थ लैंगिक अत्याचाराचा बळी असा असल्याचे पहिल्यांदाच समजले आणि ग्लॅमरस दुनियेमध्ये एकच वादळ निर्माण झाले. यामध्ये जवळपास 50 पेक्षा जास्त व्यक्तींवर आरोप करण्यात आले मात्र त्यापैकी केवळ एकाच व्यक्तीला शिक्षा झाली आहे. अमेरिकेचे टीव्ही कलाकार बिल कॉस्बी याला 10 वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तरीही #MeToo या मोहिमेला ग्लॅमरच्या दुनियेमध्ये एक वेगळेच वलय प्राप्त झाले आहे.
अमेरिकेमधील अभिनेत्रींसोबत आज जगभरातील 85 देशांमधील महिला या मोहिमेद्वारे सोशल मिडीयावर #MeToo या टॅगद्वारे आवाज उठवत आहेत. या देशांमध्ये आता भारतही सहभागी झाला आहे.
10 ऑक्टोबर, 2017 ला पहिल्यांदा न्यूयॉर्क टाइम्सने एक मोठा गौप्यस्फोट करणारी मुलाखत प्रसिद्ध केली. यामध्ये हॉलिवूडचा प्रोड्यूसर हार्वे वाइंस्टीन याच्यावर तब्बल 13 महिलांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला. मात्र, हार्वे वाइंस्टीन याने या महिल्यांच्या मर्जीनेच शरीर संबंध ठेवल्याचा दावा केला होता.
यानंतर हॉलिवूडमध्ये एकच वादळ निर्माण झाले. प्रसिद्ध अभिनेत्री ग्वानेथ पाल्ट्रो, एम्मा वॉटसन, अँजेलीना जोली, सलमा हयाक, एश्ले जुड, उमा थुरमैन आणि एशिया अर्गेंटो समवेत जवळपास 80 पेक्षा जास्त महिलांनी वाइंस्टीनच्या अत्याचारांना बळी पडल्याचा खुलासा केला. यानंतर 25 मे 2018 मध्ये त्याला अमेरिकेमध्ये अटक करण्यात आली. या प्रकरणाची सध्या सुनावणी सुरु आहे. खरेतर 2006 मध्येच अमेरिकेतील सामाजिक कार्यकर्त्या तराना बुर्के यांनी MeToo वर भाष्य केले होते. मात्र, ग्लॅमरच्या दुनियेने हा शब्दप्रयोग जगभरात पसरवला.
If you’ve been sexually harassed or assaulted write ‘me too’ as a reply to this tweet. pic.twitter.com/k2oeCiUf9n
— Alyssa Milano (@Alyssa_Milano) October 15, 2017
एका रात्रीत 5 लाख ट्विट
पहिल्यांदा हॉलिवूडची अभिनेत्री अलिसा मिलानोने 15 ऑक्टोबर 2017 मध्ये #MeToo या टॅगचा वापर करून तिच्यावरील अत्याचार उघड केला. यानंतर ट्विटरवर अक्षरश: ट्विटचा पाऊस पडला. एका रात्रीत यावर लाख ट्विट केले गेले. यानंतर या #MeToo मोहिमेने पूर्ण अमेरिकेला व्यापले.
या अभियानानंतर अमेरिकेमध्ये 300 हून जास्त महिलांनी ‘टाइम्स अप’ही मोहीम सुरु करत लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठविण्याची हीच वेळ असल्याचे स्पष्ट केले. एकट्या अमेरिकेतच अनेक अभिनेते, निर्माते, दिग्दर्शकांवर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. यामध्ये तेथील सर्वोच्च न्यायालयाचे नवनिर्वाचित न्यायधीश ब्रेट कैवनॉपण सहभागी आहेत.
भारतात लैंगिक शोषण मोठा मुद्दा; पण लैंगिक समानता नाही
भारतात महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार मोठा मुद्दा मानले जाते. हे प्रकार रोखण्यासाठी सरकारने कडक कायदेही केले आहेत. मात्र, सरकारी कार्यालये आणि खासगी कंपन्यांमध्येही महिला अत्याचाराच्या बळी पडत आहेत. तसेच लैंगिक समानतेलाही थारा नाही. यामुळे 20 टक्के महिलांनाच त्यांच्यावरील ओढवलेल्या प्रसंगाबाबत बोलण्याची संधी मिळते.