मेक्सिकन वंशाच्या मुलाची अमेरिकेत पोलिसाकडून हत्या
By admin | Published: August 12, 2016 03:07 AM2016-08-12T03:07:11+5:302016-08-12T03:07:11+5:30
अमेरिकेमध्ये पोलीस अधिकाऱ्याने मेक्सिकन वंशाच्या जेस्सी रोमेरियो (१४) याला गोळी घालून ठार मारले. जेस्सी या २४ आॅगस्ट रोजी १५ वर्षांचा होणार होता.
लॉस एंजिलिस : अमेरिकेमध्ये पोलीस अधिकाऱ्याने मेक्सिकन वंशाच्या जेस्सी रोमेरियो (१४) याला गोळी घालून ठार मारले. जेस्सी या २४ आॅगस्ट रोजी १५ वर्षांचा होणार होता. प्रारंभी पोलिसांना तो २० वर्षांचा आहे, असे वाटले होते. मंगळवारी रात्री ही घटना घडली. या मुलाने पोलीस अधिकाऱ्यावर गोळीबार केला होता, अशा शब्दांत लॉस एंजिलिस पोलिसांनी या घटनेचे समर्थन केले.
लॉस एंजिलिसजवळ असलेल्या ठिकाणी काही लोक भिंतींवर लिहीत होते. त्याची चौकशी करण्यासाठी दोन पोलीस अधिकारी गेले होते. आम्ही तेथे पोहोचताच ‘संशयित’ पळून जाऊ लागला व आम्ही त्याचा पाठलाग केला असा पोलिसांचा दावा आहे. आमच्यापैकी एका अधिकाऱ्याने संशयितावर गोळी झाडली, कारण त्या संशयिताने आमच्यावर गोळीबार केला, असेही पोलिसांचे म्हणणे आहे.
या गोळीबाराचे वृत्त समजताच त्या भागातील लोक वेगवेगळ््या घटना सांगतात त्यातून गोळीबार घडला, असे लॉस एंजिलिस टाइम्सने म्हटले. काही साक्षीदारांचे म्हणणे की त्या मुलाने गोळीबार केलाच नाही. नि:शस्त्र कृष्णवर्णीय लोकांवर वंशद्वेषातून गोळीबार होत असल्याचा ठपका अमेरिकेन समाजावर
ठेवला जात असताना ही घटना घडली आहे.