या शहरात उघड्यावर सेक्स करण्यास मिळाली कायदेशीर मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 03:37 PM2018-08-22T15:37:43+5:302018-08-22T15:38:14+5:30

उघड्यावर शरीरसंबंध प्रस्थापित करणे हे जगातील बहुतांश ठिकाणी अनैतिक आणि बेकायदेशीर मानले जाते. मात्र...

This Mexican City legalises sex in public Place | या शहरात उघड्यावर सेक्स करण्यास मिळाली कायदेशीर मान्यता

या शहरात उघड्यावर सेक्स करण्यास मिळाली कायदेशीर मान्यता

Next

मेक्सिको सिटी - उघड्यावर शरीरसंबंध प्रस्थापित करणे हे जगातील बहुतांश ठिकाणी अनैतिक आणि बेकायदेशीर मानले जाते. मात्र मेक्सिकोमधील ग्वादलजारा या शहरात उघड्यावर सेक्स करण्यास कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. 15 लाख लोकसंख्या असलेल्या या शहरात उघड्यावर प्रेमसंबंध ठेवणाऱ्यांकडून पोलीस लाच उकळत असतात, त्यांना प्रतिबंध घालण्यासाठीच हा कायदा बनवण्यात आल्याचे यासाठी पुढाकार घेणाऱ्या एका कौन्सिलरने सांगितले. 

 नव्या बदलांनुसार  ग्वादलजारा  या शहरात सार्वजनिक ठिकाणे, रिकाम्या जागा, वाहनाच्या आत किंवा जिथून इतर लोक पाहू शकतील, अशा ठिकाणावर लैंगिक चाळे करणे हे आता जोपर्यंत एखादा नागरिक पोलिसांकडे या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी करत नाही, तोपर्यंत गुन्हा मानला जाणार नाही.  

कायद्यातील या बदलासाठी पुढाकार घेणारे नेते ग्वाडालूप मॉरफिन ओतेरो यांनी सांगितले की, सार्वजनिक ठिकाणी लैंगिक चाळे केल्यास पोलीस लाचेची मागणी करतात, असे 90 टक्के विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे." दरम्यान. या कायद्यामुळे आता पोलीस अधिक गंभीर गुन्ह्यांकडे लक्ष केंद्रित करू शकतील, असे काही नेत्यांचे मत आहे. मात्र  ग्वादलजारा हे मेक्सिकोमधील परंपरावादी शहर असल्याने विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून याला विरोध होत आहे.  

Web Title: This Mexican City legalises sex in public Place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.