VIDEO: खराब रस्त्यानं नागरिक त्रस्त; महापौराला गाडीला बांधून फरफटवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 10:59 AM2019-10-10T10:59:42+5:302019-10-10T11:00:53+5:30

रस्ते दुरुस्ती करण्याचं आश्वासन पूर्ण न केल्यानं नागरिक संतप्त

Mexico mayor tied to car and dragged along by angry locals after failing to fulfill promises | VIDEO: खराब रस्त्यानं नागरिक त्रस्त; महापौराला गाडीला बांधून फरफटवलं

VIDEO: खराब रस्त्यानं नागरिक त्रस्त; महापौराला गाडीला बांधून फरफटवलं

Next

मेक्सिको: महापौराला गाडीला बांधून फरफटवल्याप्रकरणी पोलिसांनी अकरा जणांना अटक केली आहे. रस्ते खराब असल्यानं ग्रामस्थांनी महापौरांना त्यांच्या कार्यालयातून बाहेर काढून एका पिकअप ट्रकला बांधलं आणि रस्त्यावरुन फरफटत नेलं. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत महापौराची सुटका केली. मेक्सिकोमध्ये हा प्रकार घडला.

महापौर जॉर्ज लुईस इस्कॅन्डॉन हेर्नानडेझ यांनी ग्रामस्थांना रस्ते दुरुस्त करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र वारंवार वचनाची आठवण करुन देऊनही त्यांनी रस्ते दुरुस्त केले नाहीत. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी हेर्नानडेझ यांना कार्यालयातून बाहेर काढलं. यानंतर त्यांना पिकअप ट्रकला बांधून फरफटवण्यात आलं. या घटनेनंतर परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. याआधीही आश्वासनं पूर्ण न केल्यानं हेर्नानडेझ यांच्यावर शेतकऱ्यांनी हल्ला केला होता. 



हेर्नानडेझ यांच्यावरील हल्ल्याची दृश्यं कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. त्यामध्ये काही जण त्यांना इमारतीमधून बाहेर खेचून आणून गाडीला बांधताना दिसत आहेत. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीतही कैद झाला आहे. त्यामध्ये गाडीच्या मागे फरफटत जाणारे हेर्नानडेझ दिसत आहेत. या प्रकरणी आपण अपहरण आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करणार असल्याचं हेर्नानडेझ यांनी सांगितलं. 



मेक्सिकोमधील महापौर आणि राजकीय नेत्यांवर याआधी अनेकदा हल्ले झाले आहेत.  बहुतेकदा हे हल्ले ड्रग्स माफियांकडून केले गेले आहेत. मात्र आता आश्वासनं पूर्ण न करणाऱ्या लोकप्रतिनिधींवरदेखील हल्ले होऊ लागले आहेत. संतप्त स्थानिकांकडून लोकप्रतिनिधींना लक्ष्य करण्यात येत आहे. 

Web Title: Mexico mayor tied to car and dragged along by angry locals after failing to fulfill promises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.