मेक्सिकोत ज्वालामुखीचा उद्रेक; शेकडो नागरिकांचे विस्थापन
By admin | Published: October 2, 2016 02:37 AM2016-10-02T02:37:43+5:302016-10-02T02:37:43+5:30
मेक्सिकोमधील 'व्हालकॅनो ऑफ फायर' अशी ओळख असलेला ज्वालामुखी पुन्हा प्रज्वलीत झाल्याने परिसरातील शेकडो लोकांच्या विस्थापनास शनिवारी सुरुवात करण्यात आली.
Next
>कोलंबिया: मेक्सिकोमधील 'व्हालकॅनो ऑफ फायर' अशी ओळख असलेला ज्वालामुखी पुन्हा प्रज्वलीत झाल्याने परिसरातील शेकडो लोकांच्या विस्थापनास शनिवारी सुरुवात करण्यात आली.
या ज्वालामुखीचे केंद्र मेक्सिको शहरापासून वायव्य दिशेला ६९0 किमी अंतरावर आहे. राख आणि काळा धूर निघाल्यानंतर आता तप्त लाव्हा निघत असल्याने स्थानिक प्रशासनाने प्रभावित क्षेत्रातील नागरिकांसाठी विस्थापन मोहीम राबविणे सुरू केले. ला येरबाबुनिया व ला बेसेरेरा या खेड्यामधून ३५0 नागरिकांना विस्थापित करण्यात आले. जवळील ज्ॉलिस्को राज्यातही या ज्वालामुखीचा धग पोहचणार असल्यामुळे तेथील नागरिकांचे विस्थापन करण्यात येत आहे.