'मायक्रोसॉफ्ट'चे सहसंस्थापक पॉल अॅलन यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 08:30 AM2018-10-16T08:30:16+5:302018-10-16T08:45:09+5:30
जगातील प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी 'मायक्रोसॉफ्ट'चे सहसंस्थापक पॉल अॅलन यांचे वयाच्या 65 व्या वर्षी निधन झाले आहे.
सिएटल - जगातील प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी 'मायक्रोसॉफ्ट'चे सहसंस्थापक पॉल अॅलन यांचे वयाच्या 65 व्या वर्षी निधन झाले आहे. काही वर्षांपासून त्यांची कर्करोगाशी झुंज सुरू होती. त्यानंतर सोमवारी (15 ऑक्टोबर) कर्करोगाने त्यांचे निधन झाले आहे. पॉल यांच्या 'वल्कन इंक' या कंपनीने त्यांचे निधन झाल्याचे जाहीर केले. 2009 पासून ते कर्करोगावर उपचार घेत होते.
It is with deep sadness that we announce the death of @PaulGAllen, our founder and noted technologist, philanthropist, community builder, conservationist, musician and supporter of the arts. All of us who worked with Paul feel an inexpressible loss today. https://t.co/OMLZ7ivvSDpic.twitter.com/Bfa8kK6Q8e
— Vulcan Inc. (@VulcanInc) October 15, 2018
पॉल अॅलन आणि त्यांचा बालपणीचा मित्र बिल गेट्स यांनी मिळून 'मायक्रोसॉफ्ट' या कंपनीचा पाया रचला होता. 1975 मध्ये त्यांनी 'मायक्रोसॉफ्ट'ची स्थापना केली आणि काही काळातच 'मायक्रोसॉफ्ट' ही एक प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी बनली. 'मायक्रोसॉफ्ट' च्या अधिकृत ट्विटर हँडलवर अॅलन यांचे आभार मानत त्यांना आदरांजली वाहण्यात आली आहे.
Thank you, Paul. ❤️ pic.twitter.com/SDj5Xp34jj
— Microsoft (@Microsoft) October 15, 2018