Microsoft Global Outage Live Updates: आता सेवा व्यवस्थित सुरू आहेत, कंपनीकडून स्पष्टीकरण
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 02:04 PM2024-07-19T14:04:07+5:302024-07-19T22:26:11+5:30
Microsoft Global Outage Live Updates: मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने जगभरात बँकांपासून विमान वाहतुकीपर्यंतच्या सेवा ठप्प झाल्या. जगभरातील अनेक ...
Microsoft Global Outage Live Updates: मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने जगभरात बँकांपासून विमान वाहतुकीपर्यंतच्या सेवा ठप्प झाल्या. जगभरातील अनेक वापरकर्त्यांच्या विंडो सिस्टिमवर ब्ल्यू स्क्रिन दिसून आल्या. अनेक क्षेत्रांमध्ये या बिघाडाचा मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळाले. पाहा, लाइव्ह अपडेट्स...
LIVE
19 Jul, 24 : 10:04 PM
सर्व सेवा कार्यरत आहेत, माइक्रोसॉफ्ट 365 ने दिले अपडेट्स
आम्ही मिटिगेशन एक्शन पूर्ण केले आहे. आमच्या टेलीमेट्रीद्वारे समजते की, सर्व प्रभावित Microsoft 365 ॲप्स आणि सेवा सुरु झाल्या आहेत. तांत्रिक बिघाड पूर्णपणे दूर करण्यात आला आहे, असे माइक्रोसॉफ्ट 365 ने सांगितले आहे.
19 Jul, 24 : 08:21 PM
इंडिगोची जवळपास 200 उड्डाणे रद्द
मायक्रोसॉफ्टच्या ऑनलाईन सेवा यंत्रणेतील बिघाडाचा जगभरातील अनेक विमान कंपन्या आणि विमानतळांना फटका बसला आहे. भारतामध्येही याचा परिणाम दिसत असून इंडिगो विमान कंपनीला या बिघाडामुळे आपली 200 उड्डाणे रद्द करावी लागली. याबाबत इंडिगोने X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे माहिती दिली आहे.
19 Jul, 24 : 08:15 PM
समस्या मायक्रोसॉफ्ट किंवा विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये नाही - हिमांशू पाठक
सायबर तज्ज्ञ हिमांशू पाठक यांनी मायक्रोसॉफ्ट आउटेजवर सांगितले की, "समस्या मायक्रोसॉफ्ट किंवा विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमशी संबंधित नाही. ज्या संस्था त्यांच्या नेटवर्कवर क्लाउडस्ट्राइक फाल्कन एजंट वापरत होत्या, त्यांना याचा फटका बसला आहे. क्लाउडस्ट्राइकच्या लेटेस्ट अपडेटमध्ये एक दोषपूर्ण फाइल आहे. ज्यामुळे क्लाउडस्ट्राइक क्रॅश झाला आहे."
19 Jul, 24 : 06:38 PM
भारतीय बँका सुरक्षित - आरबीआय
एकंदरीत रिझर्व्ह बँकेच्या डोमेनमधील भारतीय वित्तीय क्षेत्र जागतिक आउटेजपासून लांब राहिल्या. भारतीय बँका सुरक्षित आहेत. फक्त किरकोळ व्यत्यय आल्याचे आरबीआयने म्हटले आहे.
19 Jul, 24 : 04:38 PM
मायक्रोसॉफ्टमधील तांत्रिक बिघाडासंदर्भात केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांचे एअरपोर्ट प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश.
Due to a global Microsoft cloud outage, Indian airports are facing unexpected delays.
— ANI (@ANI) July 19, 2024
Minister of Civil Aviation, Rammohan Naidu says, "I have directed airport authorities and airlines to be compassionate and provide extra seating, water, and food for passengers affected by… pic.twitter.com/yxksoBbgGq
19 Jul, 24 : 04:05 PM
हा सायबर अटॅक नाही: क्राऊट स्ट्राइकच्या सीईओंची माहिती
CrowdStrike चे अध्यक्ष आणि CEO जॉर्ज कुर्ट्झ यांनी सांगितले की, CrowdStrike Windows होस्ट्ससाठी एका अपडेटमध्ये आढळलेल्या दोषामुळे प्रभावित झालेल्या ग्राहकांसोबत सक्रियपणे काम करत आहे. Mac आणि Linux होस्टवर परिणाम होत नाही. हा सायबर हल्ला नाही. ही समस्या आहे. नेमका बिघाड शोधला आहे. त्याचे लवकरात लवकर निराकरण करण्यावर भर दिला जात आहे.
19 Jul, 24 : 03:41 PM
सायंकाळी ५ वाजेपर्यंत थांबा; विमान कंपन्यांचे प्रवाशांना माहिती
मायक्रोसॉफ्टमधील तांत्रिक बिघाडाबाबत कोणतीही अधिक माहिती देण्यात येत नाही. काही उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. अनेकांना सायंकाळी ५ वाजेपर्यंत थांबा. पुढील अपडेट दिली जाईल, असे सांगितले जात आहे. मला बंगळुरूला जायचे आहे, अशी प्रतिक्रिया चेन्नई विमानतळावरील एका प्रवाशाने दिली.
19 Jul, 24 : 03:25 PM
मायक्रोसॉफ्टची क्लाउड सर्विस डाऊन झाली आहे त्यावर आमची यंत्रणा यावर काम करत आहे: मुरलीधर मोहोळ
मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड सर्विस डाऊन झाल्यामुळे सगळ्याच सेक्टरला फटका बसलेला आहे. विशेषता विमान सेवेबाबत मी सांगत आहेत. डीजीसीए आणि इतर यंत्रणा यावर काम करतायत. इंडिगो आणि काही विमानसेवांमध्ये अडचणी येत आहेत पण प्रवाश्यांना योग्य ती सुविधा पुरवण्यात यावी यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत. नवीन बुकिंग होत नाहीयेत काही अडचणी येत आहेत. सायबर हल्ल्याविषयी अद्याप काही अधिकृत मांडण्यात आलेले नाही. पण आमच्या यंत्रणा यावर काम करत आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
19 Jul, 24 : 03:17 PM
राजीव चंद्रशेखर यांची मायक्रोसॉफ्टसह चर्चा
मायक्रोसॉफ्ट 365 आणि मायक्रोसॉफ्ट सूट लाखो भारतीय वापरतात. या प्लॅटफॉर्मवरील कोणत्याही तांत्रिक बिघाडामुळे अनेक कंपन्यांचे व्यवसाय आणि ऑपरेशन्स विस्कळीत होत आहेत. मला आशा आहे की, मायक्रोसॉफ्ट सेवा लवकर पूर्ववत होईल. सेवा लवकरात लवकर पूर्ववत होईल, हे सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकार मायक्रोसॉफ्टशी चर्चा करत आहे.
19 Jul, 24 : 03:13 PM
स्पाइस जेटचे अनेक व्यवहार मॅन्युअर मोडवर
सिस्टीम अजूनही सुरू नाही. विमानांना उशीर होत आहे आणि प्रवाशांनाही अडचणी येत आहेत, आम्ही बरीच कामे मॅन्युअल मोडवर सुरू केली आहेत. खूप गर्दी होती. आम्ही मॅन्युअल बोर्डिंग पास जारी केले. मॅन्युअल मोडवर कामांचे व्यवस्थापन केले जात आहे.
19 Jul, 24 : 03:11 PM
स्टेट बँकेच्या सेवांवर मायक्रोसॉफ्ट बिघाडाचा परिणाम नाही
स्टेट बँक ऑफ इंडियाने जाहीर केले की, मायक्रोसॉफ्ट ग्लोबल तांत्रिक बिघाडामुळे त्यांच्या सिस्टमवर कोणताही परिणाम झाला नाही. भारतातील अनेकांसह जगभरातील Microsoft वापरकर्त्यांवर परिणाम झाला आहे. आमच्याकडील सर्व सेवा सुरळीतपणे सुरू आहेत, अशी माहिती एसबीआयचे चेअरमन दिनेश खारा यांनी पीटीआयला सांगितले.
19 Jul, 24 : 03:09 PM
दुबई विमानतळावरील सेवा हळूहळू पूर्ववत
दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने सांगितले की, काही एअरलाइन्सच्या चेक-इन प्रक्रियेवर परिणाम झाला होता. मात्र, मायक्रोसॉफ्टमधील बिघाड दुरुस्त होत आहे. आता हळूहळू काही सेवा पूर्वपदावर येत आहेत.
19 Jul, 24 : 02:58 PM
पाटणा विमानतळावरील सेवांवर परिणाम
मायक्रोसॉफ्ट तांत्रिक बिघाडाचा बिहारमधील पाटणा विमानतळावरील सेवांवर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. विविध विमान कंपन्यांच्या काऊंटरवर प्रवाशांची गर्दी होताना दिसत आहे.
19 Jul, 24 : 02:55 PM
शेअर मार्केटलाही फटका
मायक्रोसॉफ्टमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडाचा फटका शेअर मार्केटला बसल्याचे सांगितले जात आहे. अनेकांना ट्रेडिंग करण्यात अडचणी येत आहेत.
19 Jul, 24 : 02:46 PM
मुंबई विमानतळावर प्रवाशांना मायक्रोसॉफ्टमधील तांत्रिक बिघाडाचा फटका
#WATCH | Mumbai: Microsoft faces global outage, flight operations affected. Visuals from Chhatrapati Shivaji Maharaj International Airport pic.twitter.com/1akiEGaAvg
— ANI (@ANI) July 19, 2024
19 Jul, 24 : 02:44 PM
मायक्रोसॉफ्टच्या तांत्रिक बिघाडामुळे लॅपटॉप सुरू होत नाहीत. विमानतळावरही सगळीकडे मोठ्या रांगा लागल्या आहेत. अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे, अशी प्रतिक्रिया एका प्रवाशाने दिली.
19 Jul, 24 : 02:43 PM
दिल्ली विमानतळावर प्रवाशांची मोठी रांग
#WATCH | Delhi: Microsoft faces global outage, flight operations affected. Visuals from Indira Gandhi International Airport, Terminal 3.
— ANI (@ANI) July 19, 2024
The airport administration tweets, "Due to the global IT issue, some of the services at the Delhi Airport were temporarily impacted. We are… pic.twitter.com/2G5eDLsvLr
19 Jul, 24 : 02:19 PM
जयपूर विमानतळावर प्रवाशांची मोठी गर्दी
मायक्रोसॉफ्टमधील तांत्रिक बिघाडामुळे जयपूर एअरपोर्टवर प्रवाशांची मोठी गर्दी वाढत आहे.
19 Jul, 24 : 02:18 PM
इंडिगो कंपनीने हाताने लिहून दिला बोर्डिंग पास
मायक्रोसॉफ्टमधील तांत्रिक बिघाडाचा जगभरातील विमानसेवा कंपन्यावर मोठा परिणाम झाला असून, प्रवाशांना हाताने बोर्डिंग पास लिहून दिला जात आहे. तसेच अन्य काही प्रक्रिया मॅन्युअर मोडवर केल्या जात आहे.
19 Jul, 24 : 02:16 PM
विस्तारा एअरलाइनकडूनही एक निवेदन देण्यात आले असून, आमच्या सेवा प्रदात्याकडून झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे आम्ही आमच्या ऑपरेशन्समध्ये अनेक आव्हानांचा सामना करत आहोत. शक्य तितक्या लवकर समस्येचे निराकरण करण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत काम करत आहोत, असे विस्तार एअरलाइनने म्हटले आहे.
19 Jul, 24 : 02:14 PM
Akasa Air च्या सेवा उपलब्ध नसतील
मायक्रोसॉफ्टमधील तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील विमानसेवांवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. अकासा एअरने याबाबत एक्सवर ट्विट करत माहिती दिली आहे. तांत्रिक बिघाडामुळे बुकिंग, चेक-इन आणि अन्य काही सेवा, ऑनलाइन सेवा तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध नसतील. सध्या आम्ही विमानतळांवर मॅन्युअल चेक-इन आणि बोर्डिंग प्रक्रिया राबवत आहोत. त्यामुळे तात्काळ प्रवास करणाऱ्यांनी आमच्या काउंटरवर चेक-इन करण्यासाठी विमानतळावर शक्य तितक्या लवकरच पोहोचावे, अशी विनंती एअर अकासाकडून करण्यात आली आहे.
19 Jul, 24 : 02:10 PM
प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे
मुंबई विमानतळ आणि गोवा विमातळावर सर्व्ह ठप्प झाल्याची बातमी आली आहे. तसेच मुंबई विमानतळावर चेक इन सिस्टिम ठप्प झाल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
19 Jul, 24 : 02:08 PM
सिंगापूर, स्पेन एअरपोर्टवर चेक इन बंद
19 Jul, 24 : 02:08 PM
ऑस्ट्रेलियात पेमेंट सेवेवर परिणाम
19 Jul, 24 : 02:08 PM
जपानच्या टोकियो विमानतळावरही परिणाम
19 Jul, 24 : 02:08 PM
युरोपातील सर्वात मोठ्या अॅम्स्टरडॅम विमानतळवरील वाहतूक ठप्प
19 Jul, 24 : 02:08 PM
ब्रिटनमध्ये रेल्वे सेवेवरही परिणाम
19 Jul, 24 : 02:08 PM
अमेरिकेत ९११ नंबरची तातडीची फोनसेवाही बंद
19 Jul, 24 : 02:08 PM
जगभरात बँक आणि हवाई सेवांचा खोळंबा
19 Jul, 24 : 02:07 PM
या तांत्रिक बिघाडामुळे ७४ टक्के यूझर्स मायक्रोसॉफ्टमध्ये लॉग इन करण्यास असमर्थ
19 Jul, 24 : 02:07 PM
जगावर मोठं सायबर संकट, मायक्रोसॉफ्ट बिघाड
ब्रिटन, जर्मनीत रुग्णलाय सेवेवरही परिणाम
19 Jul, 24 : 02:07 PM
विमानसेवा ठप्प
मायक्रोसॉफ्टमधील बिघाडामुळे भारतातील एअर इंडिया, स्पाइसजेट, इंडिगो कंपन्यांच्या विमानसेवांवर परिणाम झाला आहे.