गाझामधील युद्ध संपणार? हमासने इस्रायलकडे केली युद्धविराम वाढवण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 11:48 AM2023-11-27T11:48:15+5:302023-11-27T11:56:15+5:30

दहशतवादी संघटना हमासला सध्या सुरू असलेल्या युद्धविराम वाढवायचा आहे. हा युद्धविराम चार दिवसांसाठी होता, जो सोमवारी मध्यरात्री संपेल.

middle east israel war hamas want to extend truce after four days ceasefire end on monday gaza palestine | गाझामधील युद्ध संपणार? हमासने इस्रायलकडे केली युद्धविराम वाढवण्याची मागणी

फोटो - Reuters

इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यात 50 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. याच दरम्यान, दहशतवादी संघटना हमासला सध्या सुरू असलेल्या युद्धविराम वाढवायचा आहे. हा युद्धविराम चार दिवसांसाठी होता, जो सोमवारी मध्यरात्री संपेल.

न्यूज एजन्सी एएफपीने घडामोडींशी संबंधित लोकांचा हवाला देत म्हटलं आहे की, हमासने मध्यस्थांना कळवलं की ते दोन ते चार दिवस युद्धविराम वाढवण्यास ते इच्छूक आहेत. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, हमासचा असा विश्वास आहे की जर युद्धविराम पुढे नेला गेला तर किमान 20 ते 40 इस्रायली ओलिसांची सुटका सुनिश्चित करणं शक्य आहे. युद्धविराम करारानुसार, 150 पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या 50 लोकांना चार दिवसांत सोडण्यात येणार आहे. 

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अद्याप हल्ले लवकर थांबतील असे कोणतेही संकेत दिलेले नाहीत. 7 ऑक्टोबर रोजी युद्ध सुरू झाल्यानंतर त्यांनी प्रथमच गाझाला भेट दिली आणि 2005 पासून नाकाबंदी केलेल्या किनारपट्टीच्या प्रदेशाला भेट देणारे ते पहिले इस्रायली पंतप्रधान बनले. नेतन्याहू यांनी रविवारी गाझामध्ये तेथे तैनात असलेल्या इस्रायली संरक्षण दलाच्या (IDF) सैनिकांना भेट दिली.

युद्धविरामानंतरच्या तीन दिवसांत गाझामधून किमान 58 ओलिसांची सुटका करण्यात आली असून त्यात थायलंड, फिलिपाइन्स आणि रशियाच्या नागरिकांचा समावेश आहे. इस्रायली तुरुंगात बंदिस्त असलेल्या 117 पॅलेस्टिनी महिला आणि मुलांची इस्रायली अधिकाऱ्यांनी सुटका केली आहे. युद्धबंदी वाढवण्याच्या योजनेला अमेरिकेने पाठिंबा दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनीही अशीच अपेक्षा व्यक्त केली आहे.
 

Web Title: middle east israel war hamas want to extend truce after four days ceasefire end on monday gaza palestine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.