भयावह! "रात्रभर गोळीबार, स्फोटांचा आवाज"; इस्रायलचा हमासवर पुन्हा एकदा भीषण हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 05:20 PM2023-12-10T17:20:16+5:302023-12-10T17:21:11+5:30
Israel-Hamas War : हवाई हल्ल्यात सर्व इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला इस्रायली सैन्याने खान युनिसमध्ये प्रवेश केला होता.
दक्षिण गाझामधील खान युनिस शहरात शनिवारी रात्रीपासून जोरदार युद्ध सुरू आहे. त्याचवेळी उत्तर गाझामध्ये इस्रायली सैन्याला सातत्याने जोरदार विरोध होत आहे. गाझामधील हल्ले अशा वेळी वाढले आहेत जेव्हा अमेरिकेने लढाई थांबवण्याच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांना रोखलं. त्यांच्या जवळच्या मित्राला अधिक युद्ध सामग्री पाठवल्यानंतर इस्रायलने आपली मोहीम वाढवली आहे.
हजारो पॅलेस्टिनी नागरिकांच्या हत्येनंतर आणि गाझाच्या सुमारे 85 टक्के लोकसंख्येचे विस्थापन झाल्यानंतर, इस्रायलला आंतरराष्ट्रीय रोष आणि युद्धविरामासाठीच्या वाढत्या दबावाचा सामना करावा लागत आहे. अलीकडच्या काळात युएन सिक्युरिटी कौन्सिलमध्ये लढाई संपवण्याच्या ठरावावर आपल्या 'वीटो' शक्तीचा वापर करून इस्रायलच्या मोहिमेला महत्त्वपूर्ण पाठिंबा दिला आहे. त्यांनी इस्रायलला शस्त्रे विकली आहेत.
हमासचा खात्मा करण्याच्या आणि 7 ऑक्टोबरसारख्या हल्ल्याची पुनरावृत्ती टाळण्याच्या इस्रायलच्या ध्येयाला अमेरिकेने पाठिंबा दर्शवला आहे. इस्रायली सैन्याला उत्तर गाझामध्ये जोरदार विरोध सुरू आहे जिथे हवाई हल्ल्यात सर्व इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला इस्रायली सैन्याने खान युनिसमध्ये प्रवेश केला होता.
खान युनिसच्या रहिवाशांनी सांगितलं की, त्यांनी रात्रभर गोळीबार आणि स्फोटांचा आवाज ऐकला. ते म्हणाले की गाझामधील दुसऱ्या सर्वात मोठ्या शहरामध्ये आणि त्याच्या आसपास लढाऊ विमानांनी बॉम्बफेक केली. हमास-नियंत्रित क्षेत्रातील आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, इस्रायल-हमास युद्धामुळे गाझामध्ये मारल्या गेलेल्या लोकांची संख्या 17,700 च्या पुढे गेली आहे, ज्यामध्ये सुमारे दोन तृतीयांश महिला आणि मुलं आहेत.