'आम्ही मदतकार्यात व्यस्त आहोत, येण्याची गरज नाही...; तुर्कस्तानने पाकिस्तानला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 12:02 PM2023-02-08T12:02:26+5:302023-02-08T12:02:35+5:30

६ फेब्रुवारी २०२३ रोजी पहाटे ४:१५ वाजल्यापासून तुर्कस्तानमध्ये भूकंपाचे हादरे बसायला सुरुवात झाली. पहिला ७.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला तेव्हा त्यातून निघणाऱ्या भूकंपाच्या लहरी २६६ कि.मी.पर्यंत पसरत गेल्या.

middle east turkey syria earthquake lashed out pakistan furious on shehbaz sharif visit said no need to come | 'आम्ही मदतकार्यात व्यस्त आहोत, येण्याची गरज नाही...; तुर्कस्तानने पाकिस्तानला फटकारले

'आम्ही मदतकार्यात व्यस्त आहोत, येण्याची गरज नाही...; तुर्कस्तानने पाकिस्तानला फटकारले

googlenewsNext

६ फेब्रुवारी २०२३ रोजी पहाटे ४:१५ वाजल्यापासून तुर्कस्तानमध्ये भूकंपाचे हादरे बसायला सुरुवात झाली. पहिला ७.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला तेव्हा त्यातून निघणाऱ्या भूकंपाच्या लहरी २६६ कि.मी.पर्यंत पसरत गेल्या. तीव्र भूकंपाची खोली १० ते २० किमी दरम्यान असते. दियारबकीर शहरात पहिल्याच धक्क्याने १८ मजली उंच इमारत कोसळली. पहिल्या लाटेचा प्रभाव २ हजार कि.मी.पर्यंत जाणवला. जगभरातून तुर्कस्तानसाठी मदत जाहीर करण्यात येत आहे. अमेरिका, चीन, भारताने मदत जाहीर केली आहे.  आता आर्थिक परिस्थीशी झुंझणाऱ्या पाकिस्ताननेही  तुर्कस्तानला मदत करण्याचे जाहीर केले आहे, पण, तुर्कस्तानने पाकिस्तानवर ताशेरे ओढले आहेत. 

'आमच्या देशात येण्याची गरज नाही, आम्ही बचाव मोहिमेत व्यस्त आहोत, असं तुर्कस्तानने पाकिस्तानला म्हटले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ तुर्कस्तानचा दौरा करणार होते, आता त्यांनी दौरा रद्द केला आहे. तुर्कस्तानच्या विरोधानंतर त्यांनी हा दौरा रद्द केल्याचे सांगण्यात येत आहे. 

"मी चॉकलेट न खाल्ल्यानं फरक पडत नाही, पण..."; चिमुकल्यानं तुर्की भूकंपग्रस्तांसाठी फोडला गुल्लक

'तुर्की सरकारी अधिकाऱ्यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाला पंतप्रधान शेहबाज शरीफ यांचा दौरा रद्द करण्याची विनंती केली आहे. कारण भूकंपामुळे झालेल्या विध्वंसामुळे तुर्की बचाव आणि मदत कार्यात व्यस्त आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ, परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो आणि इतर अधिकारी भूकंपग्रस्त तुर्कस्तानला एकता दाखवण्यासाठी भेट देणार होते, अशी माहिती आहे.

दरम्यान, पाकिस्तानने भूकंपग्रस्त तुर्कस्तानला मदत जाहीर केल्यानंतर पाकिस्तानमध्ये त्यावर जोरदार टीका झाली. पाकिस्तानच्या या मदतीवर पाकिस्तानी नागरी समाज आणि माध्यमांनी टीका केली. पंतप्रधान, परराष्ट्रमंत्री आणि इतर अधिकाऱ्यांच्या या दौऱ्यावर लोकांनी टीकाही केली. कारण सध्या देश गंभीर आर्थिक संकटातून जात आहे आणि आर्थिक संरचना पूर्णपणे कोलमडली आहे. या टीकेमुळे हा दौरा रद्द करावी लागल्याचे बोलले जात आहे. 

Web Title: middle east turkey syria earthquake lashed out pakistan furious on shehbaz sharif visit said no need to come

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.