'इस्रायलने इराणवर हल्ले करावे, पण...', जो बायडेन यांचा बेंजामन नेतन्याहूंना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2024 04:48 PM2024-10-06T16:48:52+5:302024-10-06T16:49:16+5:30
Middle East War : मध्यपूर्वेतील तणाव शिगेला पोहोचला आहे.
Middle East War : मध्यपूर्वेत तणाव शिगेला पोहोचला आहे. इस्रायल सातत्याने लेबनॉन आणि गाझावर हल्ले करत आहे. तर, इराण आणि लेबनॉनकडून इस्रायलवर सातत्याने हवाई हल्ले होत आहेत. आता इराण आणि इस्रायलमध्ये थेट युद्ध सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, अमेरिकेकडून एक मोठे वक्तव्य समोर आले आहे. 'इस्रायलने इराणला प्रत्युत्तर द्यावे, पण त्यांच्या आण्विक प्रकल्पांवर हल्ले करू नका', असे आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन ( Joe Biden) यांनी केले आहे.
काय म्हणाले इस्रायलचे माजी पंतप्रधान?
इस्त्रायलचे माजी पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी त्यांच्या X (ट्विटर) हँडलवर लिहिले की, 'गेल्या 30 वर्षांपासून इराण इस्रायलींमध्ये दहशत पसरवत आहे. त्यांनी हिजबुल्ला, हमास, इस्लामिक जिहादद्वारे इस्रायल उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला. इराण सरकारने या दहशतवाद्यांना पैसा, प्रशिक्षण आणि शस्त्रे पुरवली. आमच्याकडे आधुनिक तंत्रज्ञान नसते, तर या क्षेपणास्त्रांमुळे हजारो निष्पाप लोकांचा बळी गेला असता. आता इराणच्या आण्विक कार्यक्रमाविरोधात कारवाई करण्याची वेळ आली आहे. त्यांची केंद्रीय ऊर्जा केंद्रे पूर्णपणे नष्ट करू, जेणेकरून दहशतवाद्यांचे साम्राज्य संपुष्टात येईल.'
आता नेतन्याहू फ्रान्सवर भडकले! लेबनॉनमध्ये फ्रेन्च कंपनीवर इस्रायची बॉम्बिंग, नेमकं काय घडलं?
दुसरीकडे, इस्रायलने लेबनॉनची राजधानी बेरूतमधील फ्रेंच बहुराष्ट्रीय कंपनी TotalEnergies गॅस स्टेशनला लक्ष्य केले आहे. इस्रायलचा हा हल्ला अशा वेळी करण्यात आला आहे, जेव्हा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि नेतान्याहू (Benjamin netanyahu) यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. रिपोर्टनुसार, बेरूतच्या दक्षिणेकडील उपनगरात इस्रायलने फ्रेंच कंपनी टोटल एनर्जीवर हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर स्टेशनवर मोठी आग लागली, मात्र यात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
गाझातील मशिदी आहेत 'हमासचा अड्डा'? इस्रायल बनवतोय निशाणा, एअर स्ट्राइकमध्ये अनेकांचा मृत्यू