चीनचा सर्व देशांशी सीमा वाद, भारताने चोख प्रत्युत्तर दिले - माईक पोम्पीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 09:35 PM2020-07-08T21:35:50+5:302020-07-08T21:40:30+5:30
लडाखमध्ये चिनीने घुसखोरी केल्याबद्दल भारताने घेतलेल्या भूमिकेचेही माईक पोम्पीओ यांनी कौतुक केले आहे.
वॉशिंग्टन : सीमा वादावरून अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ यांनी चीनवर सडकून टीका केली आहे. कोणताही शेजारी देश असा नाही की, ज्यासोबत चीनचा सीमा विवाद झालेला नाही, असे माईक पोम्पीओ म्हणाले. अलीकडेच चीनने भूतानबरोबरच्या आपल्या सीमा वादाचा उल्लेखही केला आहे. तर लडाखमध्ये चिनीने घुसखोरी केल्याबद्दल भारताने घेतलेल्या भूमिकेचेही माईक पोम्पीओ यांनी कौतुक केले आहे.
भारत-चीन सीमा वादावर माईक पोम्पीओ म्हणाले, "मी याबाबत भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली. चीनने कोणत्याही कारणाशिवाय आक्रमक कृत्य केले आणि भारताने त्याला चोख प्रत्युत्तर दिले." याशिवाय, चिनी कम्युनिस्ट पार्टीने अलीकडेच भूतानशी झालेल्या सीमा विवादांचा संदर्भ दिला. हिमालयाच्या पर्वतरांगापासून समुद्रापर्यंत व्हिएतनामच्या सेनकाकू बेटांचा चीनशी सीमा विवाद आहे. चीनमध्ये प्रादेशिक वाद भडकवण्याचा एक पॅटर्न आहे, असे माईक पोम्पीओ यांनी सांगितले.
#WATCH - I have spoken with Foreign Minister S Jaishankar a number of times about this. Chinese took incredibly aggressive actions and Indians have done their best to respond to that: Mike Pompeo, US Secretary of State on India-China border tensions pic.twitter.com/eJEVZkM9Ez
— ANI (@ANI) July 8, 2020
विदेशी देशांपेक्षा स्वत: च्या भावना उघडपणे व्यक्त करण्यासाठी चीनला अधिक भीती वाटते. चीनच्या कम्युनिस्ट पार्टीजवळ विश्वसनीयतेची समस्या आहे. ते जगाला कोरोना विषाणूचे सत्य सांगण्यात अपयशी ठरले आहेत. ज्यामुळे आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे, असे माईक पोम्पीओ म्हणाले. याचबरोबर, चिनी अॅप टिकटॉकवरील बंदीबाबतही माईक पोम्पीओ यांनी भाष्य केले. ते म्हणाले, "आम्ही अमेरिकन नागरिकांची गोपनीयता आणि त्यांच्या डेटाच्या संरक्षणासाठी वचनबद्ध आहोत. अमेरिकन लोकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आम्ही त्याचे सातत्याने मूल्यांकन करीत आहोत."
आणखी बातम्या...
मोफत धान्य, मजुरांना भाड्याचे घर...; मोदींच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
मी कोरोना चाचणी केली, होम क्वारंटाईन होतोय - अमोल कोल्हे
खबरदार, पालकांकडून फी मागाल तर... ; 'या' राज्य सरकारचा खासगी शाळांना सज्जड इशारा
"जे एका भावाला नाही जमलं ते अजित दादांनी शब्दासाठी 'करून दाखवलं'!"
CoronaVirus News : कोरोनावरील आणखी एक औषध लवकरच बाजारात; जाणून घ्या, किंमत...
हॅकर्सच्या निशाण्यावर MS Office युजर्स; ६२ देशांना केलं लक्ष्य