Mike Tyson: प्रसिद्ध बॉक्सर माईक टायसनला राग अनावर, विमानात सहप्रवाशाला धु धु धुतलं; पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 10:43 AM2022-04-22T10:43:08+5:302022-04-22T10:43:42+5:30
Mike Tyson: अमेरिकेचा प्रसिद्ध बॉक्सर माईक टायसनचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात तो विमानातील एका प्रवाशाच्या चेहऱ्यावर जोराने ठोसे मारताना दिसत आहे.
Mike Tyson Fight: अमेरिकेतील प्रसिद्ध बॉक्सर आणि अभिनेता माईक टायसन नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असतो. आता परत एकदा तो चर्चेत आला आहे. चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, त्याला अनावर झालेला राग. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, ज्यात माईक टायसन विमानातील त्याच्या सहप्रवाशाला मारहाण करताना दिसत आहे. माईक टायसन त्या प्रवाशाच्या तोंडावर ठोसे मारत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
55 वर्षीय माईक टायसन नेहमीच त्याच्या रागीट स्वभावासाठी ओळखला जातो. याआधीही तो अनेक प्रसंगी आपला संयम गमावताना दिसला आहे. यावेळी फ्लाइटमध्ये टायसन एका प्रवाशावर नाराज होऊन मारहाण करताना दिसत आहे. हे प्रकरण 20 एप्रिलचे आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
BREAKING: Mike Tyson seemed to lose his cool on a #JetBlue flight on #Wednesday night.
— Chaudhary Parvez (@ChaudharyParvez) April 22, 2022
TMZ reports states that the man assaulted was annoying #Tyson, took a selfie with him and kept trying to talk to the 55-year-old #fighter as he sat behind him.
#miketyson#News#fightingpic.twitter.com/ch9f7Mg3yI
प्रवासी टायसनला त्रास देत होता
मिळालेल्या माहितीनुसार, माईक टायसन सॅन फ्रान्सिस्कोहून फ्लोरिडाला जेटब्लू विमानाने जात होते. यावेळी, फ्लाइटमध्ये टायसनच्या मागे सीटवर एक व्यक्ती बसली होती, तो वारंवार टायसनला प्रश्न विचारत होता. अनेकदा नकार देऊनही त्या व्यक्तीने माईक टायसनशी बोलणे थांबवले नाही. यानंतर राग अनावर होऊन टायसन त्या व्यक्तीच्या तोंडावर जोराने ठोसे मारतो. विमानातील एक व्यक्ती त्याच्या मोबाईलमध्ये हा सगळा प्रकार कैद करतो.
बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगवास
टायसनने त्याचा अखेरचा अधिकृत सामना जून 2005 मध्ये खेळला होता. याससने 1996 पासून एकही विजेतेपद जिंकलेले नाही. दरम्यान, याआधीही अनेकवेळा टायसनचा राग अनावर झालेला पाहायला मिळाला आहे. 1997 मध्ये एका सामन्यादरम्यान टायसनने रागाच्या भरात एक विचित्र कृत्य केले होते. त्याने विरोधी बॉक्सर इव्हेंडर होलीफिल्डचा कान कापला होता. माईक टायसनवरही अंमली पदार्थांचे सेवन आणि बलात्काराचा गुन्हाही सिद्ध झाला आहे. यासाठी त्यांला तुरुंगातही जावे लागले आहे.