अफगाणिस्तानमधल्या कंधारमध्ये लष्करी तळावर दहशतवादी हल्ला, 43 सैनिक ठार, 9 जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2017 05:12 PM2017-10-19T17:12:48+5:302017-10-19T17:13:12+5:30
कंधारमधल्या लष्करी तळाला पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं आहे. तालिबानच्या दहशतवाद्यांनी घडवून आलेल्या आत्मघातकी हल्ल्यात 43 सैनिकांचा मृत्यू झाला आहे.
अफगाणिस्तान- कंधारमधल्या लष्करी तळाला पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं आहे. तालिबानच्या दहशतवाद्यांनी घडवून आलेल्या आत्मघातकी हल्ल्यात 43 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 9 सैनिक जखमी झालेत. तालिबाननं या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, तालिबानच्या दोन दहशतवाद्यांनी एका कारमध्ये बॉम्बस्फोटही घडवून आणला आहे. त्यानंतर तालिबानचे दहशतवादी व अफगाण सैन्यात चकमक झाली. कंधार प्रांताचे खासदार खालिद पश्तून यांनी या हल्ल्याची माहिती दिली आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर अफगाणिस्तानच्या एका सुरक्षा अधिका-यानं मृतांच्या संख्येची खातरजमा केली आहे.
अधिका-याच्या माहितीनुसार, तालिबाननं हल्ला केला त्यावेळी लष्करी तळावर 60 सैनिक तैनात होते. त्यातील 43 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तर 9 सैनिक गंभीररीत्या जखमी आहे. त्यांना उपचारासाठी जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.