सुदानमध्ये लष्कराच्या विमानाचा अपघात, अनेक अधिकाऱ्यांचा, नागरिकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 08:38 IST2025-02-26T07:45:21+5:302025-02-26T08:38:34+5:30

सुदानमध्ये लष्करी विमानाचा मंगळवारी अपघात झाला. या घटनेत अनेक अधिकारी आणि नागरिकांचा मृत्यू झाला. ही माहिती सुदानच्या सैन्याने दिली.

Military plane crashes in Sudan, killing several officers, civilians | सुदानमध्ये लष्कराच्या विमानाचा अपघात, अनेक अधिकाऱ्यांचा, नागरिकांचा मृत्यू

सुदानमध्ये लष्कराच्या विमानाचा अपघात, अनेक अधिकाऱ्यांचा, नागरिकांचा मृत्यू

सुदानमध्ये लष्करी विमानाचाअपघात झाला असून या घटनेत लष्करी अधिकारी आणि नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ही माहिती सुदानी सैन्याने दिली. या घटनेत १० जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत  सुदानी सैन्याने एक निवेदन जारी केले आहे.विमान विमानतळावरून उड्डाण घेत असताना कोसळले, यामध्ये लष्करी कर्मचारी आणि नागरिक दोघेही मृत्युमुखी पडले आणि जखमी झाले. सुदानी सैन्य एप्रिल २०२३ पासून पॅरामिलिट्री रॅपिड सपोर्ट फोर्सेस सोबत युद्ध करत आहे.

मोठा दावा...! अमेरिका-इस्रायल करू शकतात इराणच्या 'न्युक्लियर' ठिकानांवर हल्ला, 'हाय अलर्ट' जारी!

जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अपघातस्थळी आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले, असे निवेदनात म्हटले आहे. अँटोनोव्ह विमानाच्या अपघाताचे कारण तांत्रिक बिघाड होता. ग्रेटर खार्तूमचा भाग असलेल्या ओमदुरमनमधील लष्कराच्या सर्वात मोठ्या लॉजिस्टिक केंद्रांपैकी एक असलेल्या वाडी सेडना विमानतळाजवळ हा अपघात झाला.

सुडान लष्कराने केली घोषणा

सुदानीज सशस्त्र दलांनी उत्तर कोर्डोफान राज्याची राजधानी एल ओबेदचा वेढा संपवला आहे. व्हाईट नाईल राज्यातील अल-गितैना शहरावर पुन्हा नियंत्रण मिळवले आहे.

उत्तर कोर्डोफान राज्यातील अल-राहद शहरातून लष्कराच्या तुकड्या पुढे सरकल्या आहेत. या तुकड्या एल ओबेद येथे पोहोचल्या आहेत. यादवी युद्ध सुरू झाल्यापासून हे शहर अर्धसैनिक रॅपिड सपोर्ट फोर्सेसच्या नियंत्रणाखाली होते.

अल ओबैद हे सुदानच्या व्यापार आणि शेतीसाठी एक महत्त्वाचे केंद्र आहे. हे शहर दक्षिण सुदान ते पूर्व सुदानमधील पोर्ट सुदान पर्यंत जाणाऱ्या तेल पाइपलाइनच्या मार्गावर आहे. याशिवाय, हे क्षेत्र धोरणात्मकदृष्ट्या देखील खूप महत्वाचे मानले जाते.

Web Title: Military plane crashes in Sudan, killing several officers, civilians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.