कोट्यवधी महिलांचे होतील हाल-बेहाल, संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 09:49 IST2023-09-11T09:49:27+5:302023-09-11T09:49:42+5:30
महिलांनाही पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा देण्याबाबत जगभर सर्व देशांत असलेला पारंपरिक दृष्टिकोन असाच राहिला तर येत्या काळात महिलांची स्थिती आणखी गंभीर होईल.

कोट्यवधी महिलांचे होतील हाल-बेहाल, संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात इशारा
न्यूयॉर्क - महिलांनाही पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा देण्याबाबत जगभर सर्व देशांत असलेला पारंपरिक दृष्टिकोन असाच राहिला तर येत्या काळात महिलांची स्थिती आणखी गंभीर होईल. जगभरातील ३४ कोटी महिला व युवतींवर २०३० पर्यंत अत्यंत गरिबीत दिवस काढण्याची वेळ येईल, असा इशारा संयुक्त राष्ट्र संघाने जारी केलेल्या ‘प्रोग्रेस ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स : द जेंटर स्नॅपशॉट’ या अहवालात दिला.
काही देशांमधून गोळा केलेल्या माहितीच्या आधारे हा अहवाल तयार केला आहे. यात म्हटले की, या दशकाच्या अखेरीस लैंगिक समानतेचे लक्ष्य गाठायचे असेल तर दरवर्षी ३० लाख कोटींची गरज भासणार आहे.