इराणच्या 'अप्सरे'सोबत फिरायला जाणे पडले मंत्र्याला महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2018 05:43 PM2018-09-02T17:43:13+5:302018-09-02T17:44:18+5:30
इराण दौऱ्याबाबत त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला माहीती न दिल्याने मंत्रीपदावरून डच्चू देण्यात आला.
नॉर्वे : इराणची माजी सुंदरी असलेल्या मैत्रिणीसोबत सुटीवर फिरायाला जाणे नॉर्वेच्या मंत्र्याला चांगलेच महागात पडले आहे. त्यांचे दोघांचे फिरतानाचे फोटो व्हायरल झाल्याने पीर सँडबर्ग यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आपल्या इराण दौऱ्याबाबत त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला माहीती न दिल्याने मंत्रीपदावरून डच्चू देण्यात आला.
इराणविरोधात अमेरिकेने कडक निर्बंध लादले आहेत. या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्याचेही बोलले जात आहे. इराणची माजी सुंदरी बाहरेह लेतंस हीच्यासोबत सँडबर्ग इराणमध्ये फिरायला गेले होते. यावेळी ते आपल्यासोबत कार्यालयीन वापराचा फोनही घेऊन गेले होते. नॉर्वेच्या सुरक्षा यंत्रणा इराणला सुरक्षेबाबत खूपच संवेदऩशील मानतात. चीन आणि रशियाशी इराणची जवळीकताही यासाठी महत्वाचे कारण आहे. यामुळे सँडबर्ग यांचे हे वागणे अनपेक्षित होते.
बाहरेह ही इराणी असून ती तेथील राष्ट्रीय सुंदरीही राहीली आहे.नॉर्वेचे पंतप्रधान एरना सोलबर्ग यांनी या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, सँडबर्ग यांनी सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे जराही व्यावहारीकता दाखवली नाही. हा प्रकार नॉर्वेवासियांसाठी शरमेचा आहे.