पाकिस्तानी मंत्री म्हणे; सर्वच आत्मघातकी हल्लेखोर मदरशात शिकणारे विद्यार्थी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 09:14 PM2019-09-11T21:14:43+5:302019-09-11T21:14:52+5:30
पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री चौधरी फवाद हुसैन यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे.
इस्लामाबादः पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री चौधरी फवाद हुसैन यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. ट्विट करत ते म्हणाले, मदरशात शिकणारे सर्वच विद्यार्थी हे आत्मघातकी हल्लेखोर नसतात, परंतु एक कटू सत्य असंही आहे की, आत्मघातकी हल्ले करणारे हल्लेखोर हे मदरशामधील विद्यार्थी असतात. या ट्विटनंतर सोशल मीडियावर चौधरी फवाद खान पुन्हा एकदा ट्रोल झाले आहेत.
चांद्रयान 2 मोहिमेवर टीका करताना ते म्हणाले, भारताचं खेळणं मूनऐवजी मुंबईत उतरलं. डियर इंडिया! जे काम जमत नाही, त्यात कशाला पुढे पुढे करायचं. त्यांच्या ट्विटनंतर पाकिस्तानी लोकांनीही त्यांना खडे बोल सुनावले होते. हे तर बालिशपणाचं विधान असल्याचं एका पाकिस्तानी युजर्सनं सांगितलं होतं.
भारताची अवकाशातील ताकदीची तुलना केल्यास आपण कुठेच नसल्याचं सिद्ध होईल, असंही दुसऱ्या एका युजर्सनं म्हटलं होतं. श्रीलंकेच्या संघातील दहा क्रिकेटपटूंन पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाण्यास नकार दिला होता, त्यासाठीही त्यांनी भारताला जबाबदार धरलं आहे. याआधीही फवाद यांनी अनेक वादग्रस्त विधानं केली होती, त्यावेळी त्यांच्यावर टीका झाली होती.