अगुस्ताकडून तात्काळ वसुलीसाठी संरक्षण मंत्रालय प्रयत्नशील

By admin | Published: May 25, 2014 11:11 PM2014-05-25T23:11:40+5:302014-05-26T00:02:12+5:30

अगुस्ता वेस्टलँडकडून पूर्ण रक्कम वसूल करण्यासंदर्भात तात्काळ पावले उचलण्यात येतील, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे

Ministry of Defense for immediate recovery from Agusta | अगुस्ताकडून तात्काळ वसुलीसाठी संरक्षण मंत्रालय प्रयत्नशील

अगुस्ताकडून तात्काळ वसुलीसाठी संरक्षण मंत्रालय प्रयत्नशील

Next

नवी दिल्ली : अगुस्ता वेस्टलँडकडून पूर्ण रक्कम वसूल करण्यासंदर्भात तात्काळ पावले उचलण्यात येतील, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. इटलीच्या एका न्यायालयाने प्रतिबंध अल्प प्रमाणात हटविले आणि व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर व्यवहारात अगुस्ता वेस्टलँडने जमा केलेली १,८१८ कोटी रुपयांची बँक गॅरटी वसूल करण्याची परवानगी दिली. त्यानंतर संरक्षण मंत्रालयाचे वक्तव्य आले आहे. इटलीच्या न्यायालयाने २३ मे रोजी व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर व्यवहारात अगुस्ता वेस्टलँडने इटलीच्या बँकेत जमा केलेले २,२१७ कोटी रुपये वसूल करण्याची परवानगी भारताला दिली. भ्रष्टाचार आणि लाच दिल्याचे आरोप झाल्यानंतर व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर व्यवहार रद्द करण्यात आला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क) व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर प्रकरणात बँक गारंटी आणि परफारमन्स बाँडची रक्कम देण्याबाबत मिलान न्यायालयाने आॅगस्टवेस्टलँड इंटरनॅशनल लि. आणि ए. डब्ल्यू स्पा आणि ड्यूश्च बँक, इटलीच्या विरोधात भारत सरकारने केलेला दावा कायम ठेवला, असे संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Ministry of Defense for immediate recovery from Agusta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.