Airplane Crash: चमत्कार! विमान क्रॅश झाले, आगीचे लोळ उठले, तरी पायलट आणि प्रवाशाचे प्राण वाचले, कसे? पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 10:02 PM2022-11-02T22:02:58+5:302022-11-02T22:04:11+5:30
Airplane Crash: युरोपमधून एका अशा विमान अपघाताची घटना समोर आली आहे. ज्यामध्ये विमानाच्या ठिकऱ्या उडाल्या. मात्र त्या विमानातून प्रवास करत असलेला पायलट आणि प्रवाशाला काहीही झाले नाही.
लंडन - अपघाताशी संबंधित कुठली ना कुठली बातमी आपल्यासमोर येत असते. कधी रेल्वे अपघात, तर कधी विमानाच्या अपघाताच्या बातमीने आपल्या काळजाचा थरकाप उडत असतो. अशा अपघातात होणाऱ्या मृत्यूंमुळे आपलं मन हेलावतं. मात्र नुकताच युरोपमधून एका अशा विमान अपघाताची घटना समोर आली आहे. ज्यामध्ये विमानाच्या ठिकऱ्या उडाल्या. मात्र त्या विमानातून प्रवास करत असलेला पायलट आणि प्रवाशाला काहीही झाले नाही. एवढ्या मोठ्या अपघातातून प्राण वाचणे म्हणजे मोठा चमत्कारच असल्याची आता चर्चा होत आहे.
ब्रिटनच्या रोचेस्टर विमानतळावरून उड्डाण केलेले विमान अचानक अपघातग्रस्त झाले. त्यानंतर या विमानाला आग लागून त्याच्या ठिकऱ्या उडाल्या. मात्र या विमानातून प्रवास करत असलेला वैमानिक आणि प्रवाशाचे प्राण चमत्कारिकरीत्या वाचले. हे दोघेही सुखरूप आहेत. मिळालेल्या माहितीनुसार विमान अपघातग्रस्त झाल्यानंतर पायलट आणि प्रवाशी खाली पडले आणि जंगलातील झाडांवर अडकले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले.
जंगलात एक विमान अपघातग्रस्त झाले आहे, अशी माहिती मिळताच फायर ब्रिगेड आणि रुग्णवाहिकेसह पथके घटनास्थळावर पोहोचली. तसेच बचावाचे काम सुरू केले. या मदतकार्यादरम्यान, विमान नष्ट झाले असले तरी पायलट आणि प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळाली. या विमानामध्ये केवळ दोनच प्रवासी होते. ते पती-पत्नी होते. पती पायलट होता. तर पत्नी प्रवाशाच्या रूपात प्रवास करत होती. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. हे विमान जात होते त्या भागात मोठी झाडे होती. त्यांना हे विमान अडकले. या झाडांमुळेच पती-पत्नीचे प्राण वाचले.