सहाराला न्यायालयात खेचणार मिराक कॅपिटल

By Admin | Published: February 14, 2015 12:53 AM2015-02-14T00:53:00+5:302015-02-14T00:53:00+5:30

करार न पाळल्याच्या आरोपावरून सहाराविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार असल्याचे मिराक कॅपिटल या अमेरिकन वित्तीय कंपनीने स्पष्ट केले आहे.

Mirak Capital to take Sahara to court | सहाराला न्यायालयात खेचणार मिराक कॅपिटल

सहाराला न्यायालयात खेचणार मिराक कॅपिटल

googlenewsNext

न्यूयॉर्क : करार न पाळल्याच्या आरोपावरून सहाराविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार असल्याचे मिराक कॅपिटल या अमेरिकन वित्तीय कंपनीने स्पष्ट केले आहे. आमच्याविरुद्धचा अपप्रचार थांबविण्यासाठीही ही कंपनी भारतातील सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल करणाच्या तयारीत आहे.
करार न पाळणे, बदनामी करणे आणि कर्जसौद्याशी संबंधित मुद्यांवरही सहाराविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची तयारी केली जात आहे, असे मिराक या कंपनीने जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट नमूद केले आहे. सुब्रत राय यांच्या नेतृत्वाखालील सहारा समूहाने असा आरोप केला आहे की, मिराक कॅपिटलने २.०५ अब्ज डॉलरच्या कर्जसौद्यात फसवणूक आणि लबाडी केली. मिराकविरुद्ध कायदेशीर कारवाईही सुरू करण्यात आली आहे. मिराकचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सारांश शर्मा यांनी सहाराचे आरोप वेळ दडविणारे आणि निराधार आहेत. (वृत्तसंस्था)


 

 

Web Title: Mirak Capital to take Sahara to court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.