मिरिया लालागुना रोयो मिस वर्ल्ड
By admin | Published: December 20, 2015 11:44 PM2015-12-20T23:44:34+5:302015-12-20T23:44:34+5:30
स्पेनची मिरिया लालागुना रोयो यावर्षीची २०१५ ची मिस वर्ल्ड बनली आहे. रशियाची सोफिया निकितचुक दुसऱ्या, तर इंडोनेशियाची मारिया हरफंती तिसऱ्या स्थानावर आहे.
बीजिंग : स्पेनची मिरिया लालागुना रोयो यावर्षीची २०१५ ची मिस वर्ल्ड बनली आहे. रशियाची सोफिया निकितचुक दुसऱ्या, तर इंडोनेशियाची मारिया हरफंती तिसऱ्या स्थानावर आहे.
चीनच्या ब्युटी क्राऊन ग्रँड टरी हॉटेलमध्ये तीन तास चाललेल्या मिस वर्ल्डच्या या भव्य कार्यक्रमात मिरिया लालागुना रोयोची निवड जाहीर करण्यात आली.
मागील वर्षीची विजेती दक्षिण आफ्रिकेची रोलेने स्ट्रॉस हिने मिरियाला मिस वर्ल्डचा मुकुट देऊन गौरविले. मिरिया लालागुना रोयो ही बार्सिलोनाची रहिवासी आहे आणि ती सध्या फार्मसीच्या अभ्यासक्रमात शिकत आहे. मिरिया ही अतिशय उत्कृष्ट पियानो वाजविते. दरम्यान, भारताची आदिती आर्या पहिल्या २० स्पर्धकांमध्येही स्थान मिळवू शकली नाही.
चार दशकानंतर प्रथमच ‘मिस इराक’ स्पर्धा
बगदाद : युद्ध व यादवीने उद्ध्वस्त झालेल्या इराकमध्ये चार दशकांनंतर प्रथमच सौंदर्यस्पर्धा घेण्यात आली असून वीस वर्षांची शायमा अब्देल रहमान ‘मिस इराक’ मुकुटाची मानकरी ठरली. अल्कोहोल फ्री व स्वीमिंग सूट स्पर्धेचा समावेश नसलेली ही स्पर्धा एक महत्त्वाचा विजय मानला जात आहे.
स्पर्धेचे आयोजक हुमाम अल-ओबेदी म्हणाले की, आमचे जीवनावर प्रेम नाही असे काहींना वाटते. किरकूक येथील शायमा विजयी ठरली तेव्हा उपस्थितांनी एकच जल्लोष केला.
निवडीनंतर ती म्हणाली की, इराक पुढे जात आहे याचा मला आनंद आहे. ही स्पर्धा चांगली झाली व लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणणारी ठरली. आपल्या प्रसिद्धीचा वापर शैक्षणिक प्राधान्यासाठी करणार असून युद्धामुळे विस्थापित झालेल्यांच्या शिक्षणाची समस्या गंभीर आहे.