Miss Universe 2021: हरनाज संधू यंदाची मिस युनिव्हर्स, 21 वर्षांनंतर भारताला मिळाला 'ताज'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 09:17 AM2021-12-13T09:17:39+5:302021-12-13T10:42:35+5:30

Miss Universe 2021: भारताच्या हरनाजने 70 वा मिस युनिव्हर्सचा खिताब पटकावत देशाची मान जगात उंचवली आहे. 

Miss Universe 2021: Harnaj Sindhu Miss Universe this year, India's honor after 21 years | Miss Universe 2021: हरनाज संधू यंदाची मिस युनिव्हर्स, 21 वर्षांनंतर भारताला मिळाला 'ताज'

Miss Universe 2021: हरनाज संधू यंदाची मिस युनिव्हर्स, 21 वर्षांनंतर भारताला मिळाला 'ताज'

googlenewsNext

नवी दिल्ली - इंडियन गर्ल हरनाज संधूने यंदाचा मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकला असून तब्बल 21 वर्षांनी भारताला हा सन्मान मिळाला आहे. 21 वर्षीय हरनाज मूळ पंजाबची रहिवाशी असून यापूर्वी लारा दत्ताने देशाला हा बहुमान मिळवून दिला होता. इस्रायलच्या इलियट येथील एका रिसॉर्टमध्ये आयोजित या स्पर्धेत मॅक्सिकोची माजी मिस यूनिव्हर्स एंड्रिया मेजाने हरनाज संधुच्या डोक्यावर ताज चढवला. 

भारताच्या हरनाजने 70 वा मिस युनिव्हर्सचा खिताब पटकावत देशाची मान जगात उंचावली आहे. भारताने मिस युनिव्हर्स स्पर्धेत दोनवेळा ताज मिळवला आहे. सर्वप्रथम 1994 मध्ये सुष्मिता सेनने भारताला हा बहुमान मिळवून दिला. लारा दत्ताने 2000 साली हा खिताब जिंकला. त्यानंतर, आता 21 वर्षांनी हरनाज संधूने मिस युनिव्हर्सचा ताज पटकावला आहे. 

Web Title: Miss Universe 2021: Harnaj Sindhu Miss Universe this year, India's honor after 21 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.