ब्यूटी क्वीन बक्षीस घेण्यासाठी मंचावर गेली; अचानक तिच्या ड्रेसवर लाइट पडली अन् गडबड झाली!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 05:41 PM2023-01-03T17:41:15+5:302023-01-03T17:45:41+5:30

एका मॉडेल आणि माजी ब्युटी क्वीनने असा ड्रेस परिधान केला होता, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला.

Miss Vietnam organisers forced to apologise for see-through gown | ब्यूटी क्वीन बक्षीस घेण्यासाठी मंचावर गेली; अचानक तिच्या ड्रेसवर लाइट पडली अन् गडबड झाली!

ब्यूटी क्वीन बक्षीस घेण्यासाठी मंचावर गेली; अचानक तिच्या ड्रेसवर लाइट पडली अन् गडबड झाली!

googlenewsNext

व्हिएतनाममधील एका सौंदर्य स्पर्धेदरम्यान एका मॉडेल आणि माजी ब्युटी क्वीनने असा ड्रेस परिधान केला होता, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. तसेच लोकांनी हा ड्रेस परिधान केल्याबद्दल माजी ब्युटी क्वीनवर टीका केली. वास्तविक, शो दरम्यान पुरस्कार देण्यासाठी स्टेजवर पोहोचलेल्या या माजी ब्युटी क्वीनचा ड्रेस पूर्णपणे पारदर्शक होता, ज्याला पाहून तेथील लोक संतापले.

डेली स्टारच्या वृत्तानुसार, २४ वर्षीय मॉडेल फुओंग अन्ह स्पर्धेत उपविजेता ठरली. सदर स्पर्धा संपल्यानंतर आपले बक्षीस घेण्यासाठी मंचावर पोहोचली. यावेळी तिने पिवळ्या रंगाचा अतिशय पातळ पारदर्शक ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये तिचे शरीर खूप एक्सपोज होत होते. लोकांनी तिच्या ड्रेसवर नाराजी व्यक्त केली. जेव्हा तिच्या ड्रेसवर स्पॉटलाइट पडली तेव्हा तिच्या ड्रेसमधून सर्व काही दिसत होते.

आशियातील सर्वात श्रीमंत गाव भारतात; वर्षभर एकच फळ विकतात, डायरेक्ट करोडपती बनतात

ड्रेसबद्दल माफी मागितली-

या वादानंतर फुओंगने सांगितले की, तिला या ड्रेसबद्दल लाज वाटत आहे. या घटनेतून धडा घेतल्याचेही तिने सांगितले. मिस व्हिएतनाम २०२२ च्या आयोजकांनी या घटनेमुळे संतप्त झालेल्या चाहत्यांची माफीही मागितली. फुओंग २०२०च्या स्पर्धेचा उपविजेता ठरली होती. 

कार्यक्रमाच्या आयोजकांनी एक निवेदन जारी केले-

कार्यक्रमाच्या आयोजकांनी एका निवेदनात म्हटले आहे की, फुओंग अन्ह यांच्यासोबत हे घडणे अत्यंत दुर्दैवी आहे. हा ड्रेस स्टेजवर बरोबर दिसत नव्हता. त्यांनी या निवेदनात, २०२२ मिस ​​व्हिएतनामच्या आयोजकांनी घटना थांबवू न शकल्याबद्दल प्रेक्षक आणि चाहत्यांची माफी मागितली.

सोशल मीडियावर लोकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या

अनेक प्रेक्षकांनी सोशल मीडियावरही या घटनेबद्दल त्यांचे मत मांडले, काहींनी माजी ब्युटी क्वीनचे समर्थन केले तर काहींनी तिची निंदा केली. एका ट्विटर वापरकर्त्याने लिहिले, "माझ्या मते तिच्या ड्रेसमध्ये काहीही चुकीचे नाही." आणखी एका ट्विटर वापरकर्त्याने म्हटले, "हा ड्रेस सौंदर्य स्पर्धेसाठी योग्य नाही."

Web Title: Miss Vietnam organisers forced to apologise for see-through gown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.