बेपत्ता मलेशियन विमानाच्या शोधास लागू शकतात काही दशके -अधिकारी
By admin | Published: June 27, 2014 02:04 AM2014-06-27T02:04:29+5:302014-06-27T02:04:29+5:30
बेपत्ता मलेशियन विमानाचे अवशेष हिंदी महासागराच्या विशाल भागात विखुरलेले असू शकतात. त्यामुळे विमानाच्या शोधास काही दशकेही लागू शकतील,
Next
>क्वालालंपूर : बेपत्ता मलेशियन विमानाचे अवशेष हिंदी महासागराच्या विशाल भागात विखुरलेले असू शकतात. त्यामुळे विमानाच्या शोधास काही दशकेही लागू शकतील, असे मलेशियन एअरलाईन्सच्या एका प्रमुख अधिका:याने म्हटले आहे. मलेशियन एअरलाईन्सचे वाणिज्यिक प्रमुख हय़ुग डनलेव्ही म्हणाले की, या विमानासोबत काहीतरी अघटित घडलेले आहे. हे विमान मागे वळले होते व त्यानंतरचा घटनाक्रम असा घडला की, त्याला परत विमानतळावर येता येऊ शकले नाही. हे विमान दक्षिण हिंदी महासागरात कुठेतरी आहे, असे मला ठामपणो वाटते. हे विमान जेव्हा समुद्राच्या पाण्यावर आदळले तेव्हा काँक्रिटवर आदळल्यासारखे होऊन त्याचे अगणित तुकडे झाले असावेत. विमानाचे अवशेष विशाल भागात विखुरलेले असतील. याशिवाय या समुद्रात डोंगर आणि द:या आहेत. त्यामुळे हे विमान सापडण्यास खूप वेळ लागेल.