मिशीगनमध्ये वडिलांनी लाडक्या लेकींसाठी बांधले दुमजली घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 04:49 AM2017-09-22T04:49:54+5:302017-09-22T04:49:55+5:30
बापासाठी मुली फारच लाडक्या असतात व बाप त्यांचे लाड पुरवण्यासाठी खूप काही करतात. मिशीगनमध्ये अव्हेरी (५) आणि व्हायलेट (२) या बहिणी त्यांच्या वडिलांनी तयार केलेल्या बंगल्यात त्या मस्त खेळताहेत.
बापासाठी मुली फारच लाडक्या असतात व बाप त्यांचे लाड पुरवण्यासाठी खूप काही करतात. मिशीगनमध्ये अव्हेरी (५) आणि व्हायलेट (२) या बहिणी त्यांच्या वडिलांनी तयार केलेल्या बंगल्यात त्या मस्त खेळताहेत. त्यांचे वडील अॅडम बॉयद हे अॅब बिल्डींग कंपनीचे अध्यक्ष असून त्यांनी आपल्या घराच्या परसात लाडक्या लेकींसाठी हे दोन मजली सुंदर प्ले हाऊ स बांधले. माझी बायको आणि मुली यांनी या नव्या घरात मज्जा केली, आनंद लुटला.
बायको शिक्षिका असल्यामुळे त्या तिघीही या घरात बराच वेळ असतात, असे बॉयद म्हणाले. अव्हेरी आणि व्हायोलेटला भिंतींना अंजिरी रंग खूप आवडतो. त्यातही अव्हेरीला गडद तर व्हायोलेटला स्वाभाविकच जांभळा रंग पसंत आहे. मी हे घर तयार करीत होतो त्यावेळी मित्र, कुटुंबीयांसह अनेक लोकांना मी वेडेपणा करतोय, असे वाटले. परंतु जे काही तयार झाले त्याबद्दल मी खूपच समाधानी आहे. त्यांच्या आवडत्या घरात त्या दोघींना खेळताना बघून व त्यांच्याशी खेळताना मला आनंद होतो, असे बॉयद म्हणाले.