प्रेमी युगलाच्या MMS मुळे चीनमधील मॉल बनला पर्यटन स्थळ
By admin | Published: July 17, 2015 04:29 PM2015-07-17T16:29:05+5:302015-07-17T16:53:48+5:30
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मॉल्सना नवनवीन शक्कल लढवावी लागत असतानाच चीनमधील एका मॉलला मात्र चक्क एमएमएसमुळे प्रसिद्धी मिळाली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. १७ - ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मॉल्सना नवनवीन शक्कल लढवावी लागत असतानाच चीनमधील एका मॉलला मात्र चक्क एमएमएसमुळे प्रसिद्धी मिळाली आहे. या मॉलमधील चेंजिग रुममध्ये एका प्रेमी युगलाने स्वतःचा अश्लील व्हिडीओ शूट करुन नेटवर टाकला असून या व्हिडीओनंतर मॉलला अक्षरशः पर्यटन स्थळाचे रुप आले आहे.
बीजिंगमध्ये युनिक्लो हे जपानी कंपनीचे ख्यातनाम मॉल असून या मॉलच्या चेंजिग रुममध्ये काही दिवसांपूर्वी एका प्रेमी युगलाने स्वतःचा अश्लील व्हिडीओ शूट केला. हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला व युनिक्लो मॉलमधील गर्दी दिवसेगणिक वाढत गेली.दररोज अनेक जण या मॉलमध्ये येऊन सेल्फी काढून इंटरनेटवर अपलोड करताना दिसतात. तर दुसरीकडे स्थानिक पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरु केली असून या प्रकरणात सायबर नियमांचे उल्लंघन झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.