आठवडाभर मोबाईल चार्ज ठेवणारी बॅटरी

By admin | Published: March 21, 2016 02:07 PM2016-03-21T14:07:18+5:302016-03-21T14:07:18+5:30

पोसटेक येथील वैज्ञानिक चॉय आणि त्याचा पीएचडीचा विद्यार्थी कुन जूंग किम यांनी सिलिकॉन ऐवजी नवीन साहित्य वापरुन सॉलिड ऑक्साईड फ्यूल सेल (sofc) विकसित केला आहे.

Mobile charging battery throughout the week | आठवडाभर मोबाईल चार्ज ठेवणारी बॅटरी

आठवडाभर मोबाईल चार्ज ठेवणारी बॅटरी

Next

 ऑनलाइन लोकमत 

 
वॉशिंग्टन, दि. २१ - मोबाईल वापरणा-यांना नेहमीच चार्जिंगची काळजी घ्यावी लागते. कारण मोबाईलची बॅटरी चार्ज करायची राहून गेली तर, दिवसभरात अनेक अ़डचणींचा सामना करावा लागतो. पण शास्त्रज्ञांनी आता या समस्येवर उपाय शोधला आहे. पोसटेक येथील वैज्ञानिक चॉय आणि त्याचा पीएचडीचा विद्यार्थी कुन जूंग किम यांनी सिलिकॉन ऐवजी नवीन साहित्य वापरुन सॉलिड ऑक्साईड फ्यूल सेल (sofc) विकसित केला आहे. 
 
या बॅटरीमुळे तुमचे वारंवार मोबाईल चार्जिंगचे टेन्शन मिटणार आहे. ही बॅटरी आठवडाभर मोबाईलला पुरणार आहे. फक्त  आठवडयातून एकदाच तुम्हाला  मोबाईल चार्ज करावा लागेल. 
 
बहुतांश एसओएफसी  बॅटरी बनवताना सिलिकॉनचा वापर केला जातो. सिलिकॉनची झिज लवकर होते. चॉय यांनी एसओएफसी बॅटरी बनवताना दुस-या साहित्याचा वापर केला. त्यांनी स्टेनलेस स्टिल, इलेक्ट्रोलाईट, इलेक्ट्रोपासून एसओएफसीची बॅटरी बनवली. 
 
या बॅटरीचे निकाल खूपच उत्साहवर्धक आहेत. लॅपटॉप, ड्रोन, स्मार्टफोनमध्ये वापरल्या जाणारी लिथियम आयऑन बॅटरीची जागा घेण्याची क्षमता या नव्या बॅटरीमध्ये आहे. या बॅटरीच्या वापरामुळे ड्रोन विमानही अधिक तासभर उड्डाण करु शकते.  
 

Web Title: Mobile charging battery throughout the week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.