मोबाईल फोन खिशात ठेवल्याने शुक्राणू नष्ट होण्याचा धोका
By admin | Published: February 23, 2016 05:41 PM2016-02-23T17:41:34+5:302016-02-23T18:12:17+5:30
मोबाईल फोन खिशात ठेवल्याने शुक्राणू नष्ट होण्याचा तसंच प्रजनन प्रक्रियेवर परिणाम होण्याचा धोका आहे. एका संशोधनात ही माहिती समोर आली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
लंडन, दि. 23 - मोबाईल फोन खिशात ठेवल्याने शुक्राणू नष्ट होण्याचा तसंच प्रजनन प्रक्रियेवर परिणाम होण्याचा धोका आहे. एका संशोधनात ही माहिती समोर आली आहे. दिवसातून एक तासापेक्षा जास्त फोनचा वापर केल्यास हा धोका संभवू शकतो.
रिप्रोडक्टीव्ह बायोमेडिसीनने केलेल्या संशोधनानुसार मोबाईल चार्जिंगला लावला असताना बोलणे, झोपताना मोबाईल जवळ ठेवणे आणि पँटच्या शिखात मोबाईल ठेवणे यामुळे पुरुषांच्या शुक्राणूत कमालीची घसरण होऊ शकते. 109 पुरुषांवर हा सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये मोबाईल खिशात ठेवणा-यांना शुक्राणू कमी होण्याचा त्रास जास्त होत असल्याचं निदर्शनास आलं आहे.
मोबाईल फोनमधून पडणा-या उष्ण ऊर्जैमुळे शुक्राणू नष्ट होत असावेत आणि त्याचा परिणाम प्रजनन प्रक्रियेवर होत असावा असा अंदाज संशोधकांनी वर्तवला आहे. यासाठी आपल्या फोनचा कमीत कमी वापर तसंच चार्जिगला लावला असताना न वापरण्याचा सल्ला संशोधकांनी दिला आहे.