6 महिन्यांपासून तरुणाच्या पोटात पडून होता मोबाइल, एक्सरे पाहून डॉक्टरही अवाक...!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 11:20 AM2021-10-19T11:20:09+5:302021-10-19T11:22:28+5:30
रुग्णाने हा मोबाइल नेमका कसा गिळला, यासंदर्भात अद्याप स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, पोटात अडकलेला मोबाईल नैसर्गिकरित्या बाहेर येईल, असे त्याला वाटत होते. पण दुर्दैवाने तसे झाले नाही अन्...
एक व्यक्ती पोटदुखीची तक्रार घेऊन डॉक्टरांकडे गेली. यानंतर, डॉक्टरांनी तपासणीसाठी तिचा एक्स-रे काढला आणि तो एक्स-रे पाहून स्वतः डॉक्टरच अवाक झाले. कारण रुग्णाच्या पोटात एक मोबाईल फोन असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर, हा मोबाईल फोन एक-दोन नव्हे, तर तब्बल 6 महिन्यांपासून त्या रुग्णाच्या पोटातच पडून असल्याची माहिती समोर आली. (Man swallowed mobile)
'मिरर यूके'ने दिलेल्या वृत्तानुसार, इजिप्तमधील अस्वान युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये 33 वर्षीय व्यक्तीच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी त्याच्या पोटातून एक मोबाईल फोन काढला आहे. हा मोबाईल गेल्या 6 महिन्यांपासून त्याच्या पोटात होता.
रुग्णाने हा मोबाइल नेमका कसा गिळला, यासंदर्भात अद्याप स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, पोटात अडकलेला मोबाईल नैसर्गिकरित्या बाहेर येईल, असे त्याला वाटत होते. पण दुर्दैवाने तसे झाले नाही. त्याला खाण्या-पिण्याचाही त्रास होत होता. अखेर, हा मोबाईल जीवघेणा ठरल्याने, त्याला त्वरित शस्त्रक्रिया करावी लागली.
डॉक्टर्सदेखील अवाक -
संबंधित रुग्ण डॉक्टरांकडे गेल्यानंतर, डॉक्टरांनी त्याच्या पोटदुखीवर, आतड्यांच्या आणि पेटासंदर्भातील संसर्गाच्या दृष्टीने उपचार करायला सुरुवात केली. मात्र, संबंधित रुग्णाच्या पोटात मोबाईल असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते अवाक झाले. यूएईच्या मीडिया आउटलेट गल्फ टुडेनुसार, अस्वान युनिव्हर्सिटी रुग्णालयाच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष मोहम्मद अल-दाहसौरी यांनी म्हटले आहे, की एखाद्या रुग्णाने संपूर्ण मोबाईलच (Nokia 3310) गिळल्याची घटना आपण पहिल्यांदाच पाहिली आहे.