बिबट्याच्या पिंजऱ्यात करू लागली फोटोशूट, बिबटे आले आणि...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 04:18 PM2021-08-26T16:18:06+5:302021-08-26T16:18:48+5:30
बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आल.
जर्मनीमध्ये मंगळवारी एका फोटोशूट दरम्यान 36 वर्षीय मॉडेलला बिबट्यानं गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. बिल्ड या स्थानिक वृत्तपत्राद्वारे जेसिका लिडॉल्फ म्हणून ओळखली जाणारी महिला पूर्व जर्मनीतील एका प्राणी संग्रहालयात दोन बिबट्यांच्या पिंजऱ्यात फोटोशूट करत होती, तेव्हा अचानक या बिबट्यांनी तिच्यावर हल्ला केला.
मिळालेल्या माहितीनुसार, सॅक्सोनी-अनहाल्ट राज्यातील नेब्रा राज्यात म्हाताऱ्या झालेल्या प्राण्यांसाठी एक आश्रम चालवलं जातं. त्या आश्रमात ट्रॉय आणि पॅरिस नावाचे बिबटे राहतात. घटनेत जखमी झालेल्या जेसिका लिडॉल्फ नावाच्या मॉडेलला त्या बिबट्यांची माहिती नव्हती. ती या आश्रमात फोटोशूट करण्यासाठी गेली. यादरम्यान या बिबट्यांनी अचानक तिच्यावर हल्ला चढवला.
या घटनेत जेसिका गंभीर जखमी झाली, त्यानंतर तिला तात्काळ हेलीकॉप्टरने हॉस्पिटलला नेण्यात आलं. दरम्यान, बीबीसीच्या रिपोर्टनुसार, या फोटोशूटचे आयोजन आणि जेसिका लिडॉल्फचे फोटोशूट कुणी केले, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. दरम्यान, पोलिस या घटनेचा सखोल तपास कर आहेत.