किती काळापर्यंत लस आपला बचाव करेल?; मॉडर्नाचे सीईओ म्हणतात...

By जयदीप दाभोळकर | Published: January 8, 2021 10:23 AM2021-01-08T10:23:16+5:302021-01-08T10:26:45+5:30

लसीचा प्रभाव किती काळासाठी राहिल असा सर्वांच्या मनात होता प्रश्न

Moderna CEO says corona virus vaccine likely to protect for couple of years | किती काळापर्यंत लस आपला बचाव करेल?; मॉडर्नाचे सीईओ म्हणतात...

किती काळापर्यंत लस आपला बचाव करेल?; मॉडर्नाचे सीईओ म्हणतात...

Next
ठळक मुद्देब्रिटनसह अनेक देशांमध्ये मॉडर्ना लसीच्या वापरास परवानगीसीईओ म्हणाले अनेक वर्षांपर्यंत होणार बचाव

अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत अनेक देश लसींना मंजुरी मिळावी किंवा त्या युद्धपातळीवर विकसित करण्याचे प्रयत्न करत आहेत. परंतु करोना प्रतिबंधात्मक लसी किती काळ यापासून आपला बचाव करतील असा प्रश्न अनेकांकडून विचारला जात आहे. मॉडर्नानं मात्र या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. "येणाऱ्या बऱ्याच वर्षांपार्यंत ही लस कोरोनापासून बचाव करेल. परंतु त्यावर अजून संशोधन बाकी आहे," असं मत मॉडर्नाचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन बॅन्सेल यांनी सांगितलं.

अमेरिकेची बायोटेक कंपनी मॉडर्नानं गेल्या वर्षी कोरोना प्रतिबंधात्मक लस तयार करून जगाला आश्चर्याचा धक्का दिला होता. मॉडर्नाच्या लसीचा सर्वप्रथम ब्रिटनमध्ये आपात्कालिन परिस्थितीत वापर करण्यास परवानगी मिळाली होती. परंतु यानंतर अमेरिकेसहित अनेक देशांनी लसीच्या वापरासाठी परवानगी दिली. बुधवारी युरोपीयन कमिशननंही या लसीच्या वापरास मंजुरी दिली आहे.

दरम्यान, या लसीच्या वापराला मंजुरी देताना अनेकांच्या मनात ही लस किती काळासाठी प्रभावी ठरेल असा प्रश्न अनेकांच्या मनात होता. "ही लस केवळ तीन ते चार महिन्यांसाठी प्रभावी ठरेल अशी चर्चा होत आहे. परंतु तसं नाही. ही लस अनेक वर्ष कोरोनापासून लोकांचा बचाव करेल," असं स्टीफन बॅन्सेल म्हणाले. "आम्हाला विश्वास आहे की ही लस अनेक वर्षांपर्यंत प्रभावी ठरेल. ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या नव्या स्ट्रेनवरही ही लस प्रभावी ठरेल हे आमची कंपनी सिद्ध करेल," असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

Web Title: Moderna CEO says corona virus vaccine likely to protect for couple of years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.