मोदी-अबे यांची आज टोकियोत शिखर बैठक
By admin | Published: August 31, 2014 11:19 PM2014-08-31T23:19:01+5:302014-08-31T23:19:01+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांच्याशी महत्त्वाची चर्चा होणार आहे. या चर्चेसाठी मोदी रविवारी टोकियोला रवाना झाले.
टोकियो : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांच्याशी महत्त्वाची चर्चा होणार आहे. या चर्चेसाठी मोदी रविवारी टोकियोला रवाना झाले.
संरक्षण व नागरी अणु क्षेत्रासह अन्य महत्त्वाच्या करारांवर या बैठकीत स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे.
त्याआधी मोदी यांनी क्योटोमध्ये दोन पुरातन बुद्ध मंदिरांना भेट दिली. क्योटो विद्यापीठातील स्टेम सेल रिसर्च फॅसिलिटीलाही मोदी यांनी भेट दिली. भारतातील आदिवासींमध्ये आढळणाऱ्या व तेवढ्याच घातक ठरलेल्या सिकल सेल आजाराला तोंड देण्यासाठी जपानने मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. जपानचे पंतप्रधान क्वचितच विदेशी नेत्याला राष्ट्रीय राजधानीबाहेर शुभेच्छा म्हणून भेटतात; मात्र मोदी यांची भेट घेण्यासाठी शिंझो अबे टोकियोहून खास क्योटोला आले आणि त्यांच्यासोबत राहिले.