मोदी फिर से... जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांमध्ये पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 11:56 AM2021-09-05T11:56:46+5:302021-09-05T12:02:19+5:30
कोरोना काळात कोलमडलेलं व्यवस्थापन आणि देशाच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरून गेल्या काही दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चौफेर टीका होत आहे.
नवी दिल्ली - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता जागतिक पातळीवरही नोंद घ्यावी अशीच आहे. यापूर्वीही अनेकदा झालेल्या सर्वेक्षणात मोदींचा डंका जगभरात वाजला आहे. आता, पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना जगातील सर्वात आवडीचे नेते म्हणून पसंती मिळाली आहे. अमेरिकेच्या डेटा इंटेलिजन्स फर्म मॉर्निंग कन्सल्टच्या सर्वेक्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जगातील सर्वात आवडता नेता म्हणून निवड झाली आहे. या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन 5 व्या स्थानावर आहेत.
कोरोना काळात कोलमडलेलं व्यवस्थापन आणि देशाच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरून गेल्या काही दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चौफेर टीका होत आहे. त्यातच, महागाईने उच्चांक गाठल्याने सर्वसामान्य माणूस त्रस्त झाला आहे. त्यावरुन, मोदींच्या लोकप्रियतेमध्ये घट झाल्याचे दावे केले जात आहेत. मात्र, लोकप्रियतेच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिश्मा कायम असल्याचे दिसून येत आहे.
अप्रूवल रेटिंगच्या बाबतीत जागतिक नेत्यांच्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत. विशेष म्हणजे सर्वेक्षणातील या रेटींगमध्ये मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही मागे टाकलं आहे. अहवालानुसार, पीएम मोदींची अप्रूवल रेटिंग 70 टक्के आहे आणि हे रेटिंग जगातील पहिल्या 13 नेत्यांमध्ये सर्वाधिक आहे. दरम्यान, यापूर्वीही या सर्वेक्षणात मोदीच पहिल्या स्थानावर होते.
Global Leader Approval: Among All Adults https://t.co/dQsNxouZWb
— Morning Consult (@MorningConsult) September 4, 2021
Modi: 70%
López Obrador: 64%
Draghi: 63%
Merkel: 52%
Biden: 48%
Morrison: 48%
Trudeau: 45%
Johnson: 41%
Bolsonaro: 39%
Moon: 38%
Sánchez: 35%
Macron: 34%
Suga: 25%
*Updated 9/2/21 pic.twitter.com/oMhOH3GLqY
मॉर्निंग कन्सल्ट अप्रूवल रेटिंग यादी
नरेंद्र मोदी- 70%
लोपे ओब्रॅडर- 64%
मारियो द्राघी- 63%
एंजेला मार्केल- 53%
जो बायडेन- 48%
स्कॉट मॉरिसन- 48%
जस्टिन ट्रूडो- 45%
बोरिस जॉनसन- 41%
जेर बोल्सोनॅरो- 39%
मून जे-इन- 38%
पेड्रो सांचेज- 35%
इमॅनुएल मॅक्रों- 34%
योशिहिदे सुगा- 25%
मॉर्निंग कन्सल्ट ही एक राजकीय गुप्तचर संस्था आहे. ही संस्था सद्यस्थितीत ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, भारत, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण कोरिया, स्पेन, युनायटेड किंग्डम आणि युनायटेड स्टेट्स मधील सरकारी नेत्यांचे कामकाज, त्यांच्याद्वारे जागतिक स्तरावर घेण्यात आलेल्या निर्णयांसह त्यांच्यासाठी अप्रूवल रेटिंगचं निरीक्षण करते.