पाकिस्तानी नेत्याच्या लाहोर मतदारसंघात झळकले मोदी, अभिनंदनचे फलक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2020 05:12 AM2020-11-02T05:12:36+5:302020-11-02T06:55:42+5:30

Pakistan : या फलकांत अयाज सादिक यांंच्यावर निशाणा साधण्यात आला असून अनेक फलकांत त्यांना देशद्रोही संबोधण्यात आले आहे. लाहोरच्या रस्त्यांवर झळकलेल्या फलकांत अयाज सादिक यांना विश्वासघातकी संबोधत त्यांची तुलना मीर जाफर यांच्याशी करण्यात आली आहे.

Modi flashes congratulations in Pakistani leader's Lahore constituency | पाकिस्तानी नेत्याच्या लाहोर मतदारसंघात झळकले मोदी, अभिनंदनचे फलक

पाकिस्तानी नेत्याच्या लाहोर मतदारसंघात झळकले मोदी, अभिनंदनचे फलक

Next

नवी दिल्ली : पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज पक्षाचे खासदार सरदार अयाज सादिक यांचा मतदारसंघ असलेल्या लोहोरमध्ये ठिकठिकाणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्यासोबत अयाज सादिक यांचे छायाचित्र असलेली भव्य फलके शनिवारी झळकली. ही फलके सोशल मीडियावरही झळकली आहेत.
पीएमएल-एनचे खासदार अयाज सादिक यांनी आदल्या दिवशी पाकिस्तानच्या संसदेत असे सांगितले होते की,  भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची पाकिस्तानने सुटका केली नसती, तर त्या दिवशी रात्री भारताकडून हल्ला होण्याच्या भीतीने पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांना त्या बैठकीत यांना चांगलाच घाम फुटला होता आणि त्याचे  पाय लटलटत होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही फलके झळकली.
या फलकांत अयाज सादिक यांंच्यावर निशाणा साधण्यात आला असून अनेक फलकांत त्यांना देशद्रोही संबोधण्यात आले आहे. लाहोरच्या रस्त्यांवर झळकलेल्या फलकांत अयाज सादिक यांना विश्वासघातकी संबोधत त्यांची तुलना मीर जाफर यांच्याशी करण्यात आली आहे. काही फलकांमध्ये सादिक यांना अभिनंदन वर्धमानच्या रूपात दाखविण्यात आले असून अनेक फलकांत त्यांना भारताचे समर्थक म्हटले आहे.

Web Title: Modi flashes congratulations in Pakistani leader's Lahore constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.