मोदी स्वत: रशिया-भारत संबंधांची गॅरंटी; त्यांना धमकावले जाऊ शकत नाही - पुतिन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2023 09:18 AM2023-12-09T09:18:07+5:302023-12-09T09:18:30+5:30
पाश्चिमात्य राष्ट्रांनी रशियावर निर्बंध घातले होते. पण, त्या गोष्टींना न जुमानता पुतीन यांनी अद्याप युद्ध सुरू ठेवले आहे.
मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, मोदी हे स्वत: रशिया व भारत यांच्यातील संबंधांची गॅरंटी आहेत. त्यांना धमकावले जाऊ शकत नाही किंवा राष्ट्रीय हिताच्या विरुद्ध निर्णय घेण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही.
पुतीन म्हणाले की, राष्ट्रीय हितसंबंधांचे रक्षण करताना पंतप्रधान मोदींच्या कठोर भूमिकेचे कौतुक केले जाते. मी कल्पना करू शकत नाही की कोणताही निर्णय जो भारत आणि भारतीय लोकांच्या विरोधात असेल तो घेण्यासाठी मोदींना धमकावले जाऊ शकते, किंवा काहीही करण्यास भाग पाडले जाऊ शकते.
निवडणूक लढणार
रशियाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन २०२४ साली त्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी होणारी निवडणूक लढविणार आहेत. त्यांनी ही घोषणा केल्याचे रशिया सरकारच्या प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. पाश्चिमात्य राष्ट्रांनी रशियावर निर्बंध घातले होते. पण, त्या गोष्टींना न जुमानता पुतीन यांनी अद्याप युद्ध सुरू ठेवले आहे.