कर्बन उत्सर्जनाच्या मुद्दयावरुन मोदींनी विकसित देशांना फटकारले

By admin | Published: November 30, 2015 07:57 PM2015-11-30T19:57:06+5:302015-11-30T19:57:06+5:30

आपला विकास करत असताना जैविक संसाधनांच्या वापरामधून समृद्ध झालेल्या विकसित देशांनी भारतासारख्या विकसनशील देशांवर कर्बन उत्सर्जनाचे वोझं वाढवणे नैतिकदृष्टया चुकीचे आहे.

Modi rebukes developed countries on the issue of carbon emissions | कर्बन उत्सर्जनाच्या मुद्दयावरुन मोदींनी विकसित देशांना फटकारले

कर्बन उत्सर्जनाच्या मुद्दयावरुन मोदींनी विकसित देशांना फटकारले

Next
>ऑनलाईन लोकमत
पॅरिस, दि. ३० - आपला विकास करत असताना जैविक संसाधनांच्या वापरामधून समृद्ध झालेल्या विकसित देशांनी भारतासारख्या विकसनशील देशांवर कर्बन उत्सर्जनाचे वोझं वाढवणे नैतिकदृष्टया चुकीचे असल्याचे सांगत विकसित देशास नरेंद्र मोदींनी फटकारले. जागतिक हवामान बदलासंदर्भातील संयुक्त राष्ट्रसंघ परिषदेच्या अत्यंत महत्त्वपूर्ण परिषदेत भारताची भूमिका मांडत होते. हवामान बदलाच्या संकटाविरोधातील उपाययोजनेमध्ये विकसित देशांनी अधिक वाटा उचलणे आवश्‍यक असल्याचेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे. 
जागतिक हवामान बदलासंदर्भातील या परिषदेमध्ये मोदी हे जगभरातील १५० देशप्रमुखांची भेट घेणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी स्पष्ट केलेली ही भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. 
विकसित देशांना विकासाची संधी देणे, हाच खरा न्याय आहे. काही जणांच्या जीवनशैलीमुळे अजूनही विकासाच्या पहिल्या टप्प्यावर असलेल्यांना विकासाची संधी नाकारली जाऊ नये,‘‘ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. 

Web Title: Modi rebukes developed countries on the issue of carbon emissions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.