मोदी म्हणाले, जीएसटी लवकरच

By admin | Published: April 4, 2016 02:51 AM2016-04-04T02:51:15+5:302016-04-04T02:51:15+5:30

भारतात आता जीएसटी (वस्तू व सेवाकर) लागू होणार आहे. त्यामुळे पूर्वलक्षी प्रभावाचा कर आता इतिहासजमा होणार आहे, असे स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदीच्या दौऱ्यादरम्यान येथे दिले

Modi said, GST will be soon | मोदी म्हणाले, जीएसटी लवकरच

मोदी म्हणाले, जीएसटी लवकरच

Next

रियाध (सौदी अरेबिया) : भारतात आता जीएसटी (वस्तू व सेवाकर) लागू होणार आहे. त्यामुळे पूर्वलक्षी प्रभावाचा कर आता इतिहासजमा होणार आहे, असे स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदीच्या दौऱ्यादरम्यान येथे दिले. उद्योगांसाठी अनुकूल वातावरण उपलब्ध करून देण्याचा शब्द देत त्यांनी गुंतवणूकदारांना भारतात येण्याचे आवाहनही केले.
सौदीतील कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व भारतीय उद्योग व्यापार क्षेत्रातील प्रतिनिधींच्या बैठकीला संबोधित करताना मोदी बोलत होते. मोदी यांनी सौदीतील उद्योगपतींना भारतात रेल्वे, संरक्षण आणि ऊर्जा यासारख्या क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. मोदी म्हणाले की, देशात आता एकसमान अप्रत्यक्ष कर व्यवस्था जीएसटी लागू होणार आहे. ते म्हणाले की, जीएसटीबाबत काळजी करण्याची आवश्यकता नाही. जीएसटी लवकरच प्रत्यक्षात येईल. मी आपणाला निश्चित वेळ, काळ सांगू शकत नाही, पण जीएसटी लागू होणार हे मात्र निश्चित. पूर्वलक्षी प्रभावाचा कर आता इतिहासजमा झाला आहे, असे सांगून मोदी म्हणाले की, मागील सरकारच्या काळातील प्रलंबित कायदेशीर प्रकरणाबाबत मात्र आपण सध्या काही करू शकत नाही. प्रलंबित प्रकरणांबाबत मोदींनी कुणाचे नाव घेतले नाही; पण असे दोन प्रकरणे वोडाफोन आणि केयर्स यांच्याशी संबंधित आहेत. जीएसटीचे विधेयक सध्या राज्यसभेत प्रलंबित आहे. या सभागृहात सत्तारूढ सरकारचे बहुमत नाही. लोकसभेने हे विधेयक यापूर्वीच मंजूर केलेले आहे. दरम्यान, विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी टिष्ट्वट केले आहे की, पंतप्रधान मोदी यांनी सौदी अरामकोचे अध्यक्ष खालीद ए अल- फलीह यांच्यासोबत ऊर्जा व आरोग्य क्षेत्रातील मुद्यांवर चर्चा केली. सौदीचे विदेशमंत्री अदेल अल जुबेर यांनीही मोदींसोबत चर्चा केली.
सायबर हल्ले धोकादायक
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज जगाला दहशतवाद आणि सायबर हल्ले यांचा धोका आहे. सायबर दहशतवाद दिसत नाही; पण तो अधिक धोकादायक आहे. सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात प्रगतीची गरज आहे. (वृत्तसंस्था)
महिलांकडून चालविणाऱ्या जाणाऱ्या आयटी केंद्राला भेट
टाटा समूहाचे अध्यक्ष सायरस मिस्त्री आणि टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य संचालक एन. चंद्रशेखर यांनी मोदींचे स्वागत केले. एक हजार महिलांनीही टाळ्यांच्या कडकडाटात मोदी यांचे स्वागत केले. या केंद्रात मोदी ४० मिनिटे होते. यावेळी त्यांनी सेल्फीही घेतली.
>दहशतवादाला धर्मापासून वेगळे करा
दहशतवाद हा मानवतेचा शत्रू आहे, असे सांगतानाच दहशतवादाला धर्मापासून वेगळे करण्याची गरज असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. सौदीतील आपल्या दोनदिवसीय दौऱ्यात दैनिक अरब न्यूजला दिलेल्या मुुलाखतीत मोदी म्हणाले की, दहशतवादाचा कोणताही रंग, धर्म असू शकत नाही. पश्चिम आशिया क्षेत्रात दहशतवादाविरुद्धच्या लढाईत सौदीने घेतलेल्या भूमिकेचे त्यांनी कौतुक केले. जागतिक स्तरावरील दहशतवादविरोधी प्रयत्न हे कोणत्याही एका धर्म किंवा जाती समुदायाच्या विरुद्ध नाहीत, असेही ते म्हणाले. सौदीने अलीकडेच दहशतवादाविरुद्धच्या लढाईसाठी ३४ मुस्लिम देशांची एक संघटना तयार केली आहे, हे विशेष.

Web Title: Modi said, GST will be soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.