मोदी-शरीफ यांची मार्चमध्ये भेट शक्य

By admin | Published: February 20, 2016 02:50 AM2016-02-20T02:50:39+5:302016-02-20T02:50:39+5:30

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची अणू शिखर परिषदेच्या निमित्ताने अमेरिकेत भेट होऊ शकते.

Modi-Sharif meeting in March | मोदी-शरीफ यांची मार्चमध्ये भेट शक्य

मोदी-शरीफ यांची मार्चमध्ये भेट शक्य

Next

इस्लामाबाद : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची अणू शिखर परिषदेच्या निमित्ताने अमेरिकेत भेट होऊ शकते. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे या परिषदेचे यजमानपद भूषवतील. पाकिस्तानातील ‘डॉन’ या दैनिकाच्या वृत्तामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
वॉशिंग्टनमध्ये ३१ मार्च आणि १ एप्रिल रोजी अणू शिखर परिषद होत असून, ओबामांनी मोदी आणि शरीफ यांना या परिषदेचे निमंत्रण दिले असून, या दोन्ही नेत्यांनी ते स्वीकारले आहे. ओळख उघड न करण्याच्या अटीवर एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले की, शक्यता (मोदी-शरीफ यांची भेट) खूप आहे.
तथापि, भारत-पाकिस्तान चर्चेचा इतिहास तुम्हाला माहीत आहे, अशी तिरकस टिपणीही या अधिकाऱ्याने केली. (वृत्तसंस्था)

Web Title: Modi-Sharif meeting in March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.