समुद्राच्या पिण्यायोग्य पाण्याची मोदींनी चाखली चव!
By admin | Published: July 7, 2017 05:08 AM2017-07-07T05:08:48+5:302017-07-07T05:08:48+5:30
पंतप्रधान मोदी यांनी नेत्यानाहू यांच्यासोबत हैफा येथील वोगला बीचवरील गाल-मोबाइल जलशुद्धीकरण प्रकल्पालाही भेट दिली. समुद्राचे
पंतप्रधान मोदी यांनी नेत्यानाहू यांच्यासोबत हैफा येथील वोगला बीचवरील गाल-मोबाइल जलशुद्धीकरण प्रकल्पालाही भेट दिली. समुद्राचे पाणी क्षारमुक्त तसेच शुद्ध करून वापरण्याच्या तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिकही या वेळी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांना देण्यात आले.
गाल-मोबाइल हे जलशुद्धीकरणाची चालती फिरती यंत्रणा आहे. त्यातून समुद्राचे पाणी क्षारमुक्त करून पिण्याजोगे केले जाते. या शुद्धीकरण वाहनातूनहंी दोन्ही नेत्यांनी थोडा प्रवास केला. हे तंत्रज्ञान पूर, भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीवेळी आणि दुर्गम भागात तैनात असणाऱ्या लष्करासाठी तसेच ग्रामीण भागासाठी उपयुक्त ठरेल, अशी प्रतिक्रिया मोदी यांनी दिली.
स्मृतिस्थळाला भेट
ऐतिहासिक दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या आणि अखेरच्या दिवशी इस्रायलसाठी बलिदान देणाऱ्या भारतीय सैनिकांच्या स्मृतिस्थळी भेट दिली.