मे महिन्यात मोदी चीनला भेट देणार

By admin | Published: February 2, 2015 01:15 AM2015-02-02T01:15:14+5:302015-02-02T01:15:14+5:30

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ मे पूर्वी चीनला भेट देणार असून, ही त्यांचा हा पहिलाच चीन दौरा असेल. भारत व चीन या दोन देशांचे प्रमुख नेते

Modi will visit China in May | मे महिन्यात मोदी चीनला भेट देणार

मे महिन्यात मोदी चीनला भेट देणार

Next

बीजिंग : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ मे पूर्वी चीनला भेट देणार असून, ही त्यांचा हा पहिलाच चीन दौरा असेल. भारत व चीन या दोन देशांचे प्रमुख नेते परस्परांना भेटत असून, दोन्ही देशांच्या संबंधाना वेगळे वळण लागू शकते, असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले.
स्वराज या सध्या चार दिवसीय चीन दौऱ्यावर आहेत. मोदींच्या चीन भेटीच्या तारखा चीन सरकारला देणार आहे. आपला चीन दौरा मोदी यांच्या दौऱ्याच्या तयारीसाठी असल्याचे स्वराज यांनी सांगितले.
कैलास मानसरोवर यात्रा
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आणखी एखादा मार्ग खुला करण्याच्या हेतूने करार झाला आहे, असे स्वराज म्हणाल्या. हा पर्यायी मार्ग खुला झाल्याने कैलास मानसरोवराला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांना थेट बसने या स्थळापर्यंत जाता येईल, असे स्वराज म्हणाल्या. (वृत्तसंस्था)





 

 

Web Title: Modi will visit China in May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.