मोदींनी जिंकली सिलिकॉन व्हॅली!

By admin | Published: September 29, 2015 03:30 AM2015-09-29T03:30:01+5:302015-09-29T03:30:01+5:30

पंतप्रधान झाल्यापासून दुसऱ्यांदा अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या नरेंद्र मोदींनी जगभरातील आयटी उद्योगाचे केंद्रस्थान असलेली ‘सिलिकॉन व्हॅली’ रविवारी जिंकली.

Modi won Silicon Valley! | मोदींनी जिंकली सिलिकॉन व्हॅली!

मोदींनी जिंकली सिलिकॉन व्हॅली!

Next

पंतप्रधान झाल्यापासून दुसऱ्यांदा अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या नरेंद्र मोदींनी जगभरातील आयटी उद्योगाचे केंद्रस्थान असलेली ‘सिलिकॉन व्हॅली’ रविवारी जिंकली. गुगल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅपल आणि क्वॉलकॉम या कंपन्यांची मुख्यालये अक्षरश: मोदीमय झाली होती. आर्थिक सुधारणांची प्रक्रिया गतिमान करण्यासह व्यवसायाभिमुख वातावरण निर्माण करण्याच्या मार्गातील अडथळे दूर करण्याची ग्वाही देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभर दबदबा असलेल्या सिलिकॉन व्हॅलीतील एकापेक्षा एक सरस अशा ४७ कंपन्यांची धुरा सांभाळणाऱ्या अग्रणी उद्योगपती आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी (सीईओ) थेट संवाद तर साधलाच; शिवाय भारतात गुंतवणुकीच्या कशा अमाप संधी आहेत, भारताने आर्थिक वृद्धीसाठी हाती घेतलेल्या उपाययोजनांची माहिती देत ‘मेक इन इंडिया,’ ‘डिजिटल इंडिया,’ ‘स्टार्टअप’ या महत्त्वाकांक्षी योजनातहत सिलीकॉन व्हॅलीतील टॉप टेक कंपन्यांना भारताची वाट धरण्यास राजी केले.
-------
अश्रू तरळले...
फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्याशी झालेल्या संवादात आपली आई दुसऱ्यांच्या घरची धुणीभांडी करीत असे, हा उल्लेख करताना पंतप्रधान भावनाप्रधान झाले; त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
-------
1984 नंतर कोणाही भारतीय पंतप्रधानाने सिलिकॉन व्हॅलीला दिलेली ही पहिलीच भेट होती.
30वर्षांत सिलिकॉन व्हॅलीचे प्राबल्य जसे वाढले तसेच तेथे भारतीयांचा दबदबाही वाढला.
47कंपन्यांची धुरा सांभाळणाऱ्या अग्रणी उद्योगपती आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी (सीईओ)
थेट संवाद साधला.
----------
‘मेक इन इंडिया’ प्रकल्पाला अधिक भक्कम बनवायचे असेल तर पायाभूत सुविधांचा विकास हा अत्यावश्यक आहे. मात्र या क्षेत्राला गतिमान बनविण्यासाठी सरकारने जीपीडीच्या १० टक्के रक्कम ही पायाभूत विकासासाठी खर्च करणे गरजेचे असल्याचे मत उद्योगांची शिखर संघटना असलेल्या ‘असोचेम’ने वर्तविले आहे. सध्या जीपीडीच्या सहा टक्के इतकी रक्कम ही पायाभूत सुविधांच्या
निर्मितीवर खर्च केली जाते. - आणखी वृत्त/७
----------
500रेल्टे स्टेशन ‘वाय-फाय’ सुविधेने सज्ज करणार
सुरुवातीला ही सुविधा मोफत असेल. याशिवाय २०१६ अखेर भारतातील १०० रेल्वे स्टेशनांवर हायस्पीड इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली जाणार. त्यानंतरच्या वर्षात आणखी ४०० रेल्वे स्टेशनांपर्यंत त्याचा विस्तार केला जाईल.
------------
10
भारतीय
भाषेत पुढील
महिन्यापासून अँड्राइड फोनआधारित टायपिंगची सुविधा.
पहिल्या १०० रेल्वे स्टेशनांवरून दररोज प्रवास करणाऱ्या १० दशलक्ष प्रवाशांना या सुविधेचा लाभ मिळेल. चेन्नईपासून सुरुवात. भारतातील हा सर्वात मोठा सार्वजनिक वाय-फाय प्रकल्प असेल.
---------
पाच लाख गावे स्वस्तात ब्रॉडबँडने जोडणार
भारत सरकारच्या ई-गव्हर्नेस आणि मोबाइल-गव्हर्नेस योजनेला चालना मिळेल. भारतात क्लाऊड डाटा केंद्र सुरू करणार
-----------
150दशलक्ष डॉलरच्या गुंतवणुकीसाठी इंडिया व्हेंचर इन्व्हेस्टमेन्ट फंड स्थापन करणार
त्यातून मोबाइल आणि इंटरनेट आॅफ इव्हरीथिंग इकोसिस्टीम क्षेत्रातील स्टार्टअप कंपन्यांसाठी आर्थिक हातभार लावला जाणार.
--------
स्टार्टअप योजनेला आर्थिक, विपणन, तंत्रज्ञान आणि व्यावसायिक मदत करणार.
बंगळुर येथे इनोव्हेशन लॅबही स्थापणार.
------
भारतात मॅन्युफॅक्चरिंग प्रकल्प सुरू करणार
मोबाइल पेमेंट प्लॅटफॉर्म ‘अ‍ॅपल-पे’शी जनधन योजना संलग्नित करण्याबाबतही चर्चा

Web Title: Modi won Silicon Valley!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.