चीनमध्येही पंतप्रधान मोदींची क्रेझ, मोदी सरकारवर चीनी नागरीक खुश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 02:04 PM2020-08-27T14:04:47+5:302020-08-27T14:05:10+5:30
भारत आणि चीनमधील संबंध गेल्या काही महिन्यांपासून ताणले गेले आहेत, चीनी सैन्याने लडाखमध्ये घुसकोरीचा प्रयत्न केल्याने दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. त्यातच, भारताने 59 चीनी अॅप्सवर बंदी घातली असून देशातील नागरिकांनीही चीनी मालावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं.
नवी दिल्ली - चीननेलडाखमध्ये गेल्या काही महिन्यांपासून घुसखोरी केली आहे. जूनमध्ये भारतीय जवानांवर भ्याड हल्ला करण्यात आला. त्यामध्ये 20 जवान शहीद झाले होते. यानंतर देशात चीनविरोधात संतापाची लाट आली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखमध्ये घुसखोरी झाली नसल्याचे सांगितले होते. तसेच, मोदींनी लडाखमध्ये जाऊन भारतीय सैन्याचा आत्मविश्वास वाढवला. त्यामुळे मोदींची आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगलीच चर्चा झडते. आता, चीनमधील ग्लोबल टाइम्सच्या सर्वेक्षणानुसार चीन नागरिकांमध्येही मोदींची क्रेझ आहे.
भारत आणि चीनमधील संबंध गेल्या काही महिन्यांपासून ताणले गेले आहेत, चीनी सैन्याने लडाखमध्ये घुसकोरीचा प्रयत्न केल्याने दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. त्यातच, भारताने 59 चीनी अॅप्सवर बंदी घातली असून देशातील नागरिकांनीही चीनी मालावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं. भारताच्या या आक्रमकतेमुळे चीनी कंपन्यांच्या मार्केटवर मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान, चीनचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सने एक सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार, चीन नागरिकांमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदींची क्रेझ असल्याचं दिसून येतंय.
सर्वेक्षणानुसार, 50 टक्के नागरिक बिजींगच्या बाजूने आपले मत नोंदवत आहेत. तर, 50 टक्के नागरिकांनी भारतातील मोदी सरकारचं कौतुक केलंय. जवळपास 70 टक्के नागरिकांना भारताच चीनविरोधी भावना तीव्र असल्याचं वाटत आहे. त्यातच, 30 टक्के लोकांना दोन्ही देशातील हे संबंध सुधारतील अशी आशा आहे. भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या संबंधात सुधार झाला तरी, तो काही काळापुरता असेल असे 9 टक्के लोकांना वाटते. तर, 25 टक्के नागरिकांना वाटते की, दोन्ही देशांतील संबंध जास्त काळापर्यंत मजबूत राहतील. दरम्यान, चीनची कंपनी असलेल्या हुआवेईने भारतातील सर्वच प्रमुख दैनिकांत जाहिरात प्रसारीत करुन व्यवसायिक संबंधात सुधार आणण्याचा प्रयत्न केला आहे.
लडाख सीमारेषेवर अद्यापही तणाव
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी लडाखमधील परिस्थिती 1962 नंतर सर्वात गंभीर बनली असल्याचे म्हटले आहे. जयशंकर यांनी त्यांचे पुस्तक अनावरण करण्याआधी रेडिफला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी सध्या 1962 नंतर सर्वांत गंभीर परिस्थिती ओढवली असल्याचे कबूल केले आहे. गेल्या 45 वर्षांत पहिल्यांदा एलएसीवर आमच्या सैनिकांना हौतात्म्य आले. सीमेवर दोन्ही देशांकडून मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात करण्यात आले आहे.